संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान सदनातील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये होणार राष्ट्रीय संविधान दिन सोहळ्याचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 25 NOV 2025 2:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

संविधान दिन, 2025 चा राष्ट्रीय कार्यक्रम निमित्ताने बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये (मध्यवर्ती सभागृहात) होणार आहे. या कार्यक्रमातून संवैधानिक मूल्यांप्रती आणि लोकशाही परंपरांप्रती असलेल्या भारताच्या वचनबद्धतेविषयी पुनर्निर्धार व्यक्त केला जाईल.

राष्ट्रपती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाला देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि दोन्ही सदनांचे संसद सदस्य उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती उपस्थितांना संबोधित करतील, त्यानंतर  राष्ट्रपतींचे मुख्य भाषण होईल.

संविधान दिनाच्या निमित्ताने सेंट्रल हॉलमध्ये होणार असलेल्या सोहळ्यात खाली नमूद प्रकाशनांचे डिजिटल स्वरुपात विमोचन करण्याचे योजले  गेले आहे :

  • विधि विभागाने तयार केलेल्या संविधानाच्या नऊ भाषांमधील (मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलगू, ओडिया आणि आसामी) प्रतींचे प्रकाशन.
  • सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केलेल्या "भारत की संविधान से कला और कैलीग्राफी" (हिंदी आवृत्ती) या स्मारक पुस्तिकेचे प्रकाशन.

या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखालील संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन देखील होणार आहे.

देशभरातही, सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग, त्यांच्या अखत्यारितील आणि संलग्न कार्यालये, राज्य/केंद्रशासित प्रदेशांची सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील, या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करतील. नागरिक खाली नमूद माध्यमांद्वारे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील:

  • MyGov.in आणि Constitution75.com वर उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन करणे.
  • सहभाग प्रमाणपत्र निर्मिती आणि सामाज माध्यमांवर सामायिकीकरण.
  • हमारा संविधान - हमारा स्वाभिमान या विषयावरील राष्ट्रीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा (quiz) आणि ब्लॉग/निबंध स्पर्धा.
  • पंचायत स्तरापासून ते संसद स्तरापर्यंत होणाऱ्या परिषदा, चर्चासत्रे, वादविवाद उपक्रम , लघुचित्रपट सादारीककरण, प्रदर्शने , सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर/चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा तसेच संविधानावर आधारित इतर उपक्रम.

अशा प्रकारे, संविधान दिन, 2025 हा संवैधानिक मूल्यांचा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाईल, या उत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातील आणि जगभरातील भारतीय नागरिक सहभागी होतील.


गोपाळ चिपलकट्टी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2194059) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada