इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताने इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग निर्मिती योजना (ECMS) - 7,172 कोटी रुपये गुंतवणूक, 65,111 कोटी रुपये उत्पादन आणि 11,808 थेट रोजगार अंतर्गत 17 मंजुरींचा दुसरा टप्पा जाहीर केला
Posted On:
17 NOV 2025 10:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
पूर्वी जाहीर केलेल्या 5,532 कोटींच्या सात अर्जांच्या मंजुरीनंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग निर्मिती योजना (ECMS) अंतर्गत आणखी 17 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. हे मंजूर प्रकल्प देशभरात विविध ठिकाणी आहेत ज्यात एकूण 7,172 कोटी रुपयांची गुंतवणूक, 65,111 कोटी रुपयांचे एकत्रित अंदाजित उत्पादन आणि 11,808 थेट रोजगार संधी निर्माण होतील.
मंजूर झालेले युनिट्स गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या 9 राज्यांमध्ये आहेत, जे महानगरांच्या पलीकडे संतुलित प्रादेशिक वाढ आणि उच्च-कौशल्यपूर्ण रोजगार निर्माण करण्याप्रति सरकारची वचनबद्धता मजबूत करतात.
दुसऱ्या टप्प्यात विविध घटक आणि उप-असेंब्लीची विस्तृत शृंखला आहेत, जसे की:
जेबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेटकेम सप्लाय चेन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे भारतातील पहिली ऑप्टिकल ट्रान्सीव्हर (SFP) उत्पादन सुविधा;
राकोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संचार उपकरणे , संगणक आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये अचूक वेळेच्या अनुप्रयोगांसाठी ऑसिलेटर; उच्च दर्जाची अचूकता
एक्झ कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारा लॅपटॉप आणि स्मार्टवॉचसाठी एन्क्लोजर;
एएसयूएक्स सेफ्टी कंपोनेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनो मिंडा लिमिटेड आणि सिर्मा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड द्वारा कॅमेरा मॉड्यूल;
टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा इलेक्ट्रॉनिक अनुप्रयोगांसाठी कनेक्टर;
हाय-क्यू इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, सेक्युअर सर्किट्स लिमिटेड, झेत्फॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एहूम आयओटी प्रायव्हेट लिमिटेड, सिएरा सर्किट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, मीना इलेक्ट्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, एटी अँड एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मायक्रोपॅक प्रायव्हेट लिमिटेड आणि इन्फोपॉवर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नऊ कंपन्यांद्वारे मल्टी-लेयर पीसीबी.
हे घटक स्मार्टफोन, आयटी हार्डवेअर, वेअरेबल्स, टेलिकॉम, ईव्ही, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या प्रमुख क्षेत्रांना सेवा पुरवतात.
मंत्र्यांनी सायंट सेमीकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अझीमुथ एआय यांनी संयुक्तपणे विकसित केलेली पहिल्या पिढीची ऊर्जा कार्यक्षम एज सिलिकॉन चिप (एसओसी) (एआरकेए-जीकेटी1) चे देखीलअनावरण केले. प्लॅटफॉर्म-ऑन-ए-चिप एसओसी प्रगत संगणकीय कोर, हार्डवेअर एक्सीलरेटर, ऊर्जा -कार्यक्षम डिझाइन आणि सुरक्षित सेन्सिंग एकाच चिपमध्ये एकत्रित करते, ज्यामुळे खर्च आणि जटिलता कमी होऊन 10 पट चांगली कामगिरी होते. हे स्मार्ट युटिलिटीज, शहरे, बॅटरी आणि औद्योगिक आयओटीला सहाय्य करते , उत्पादन-संचालित, उच्च-कार्यक्षम सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या दिशेने भारताचे संक्रमण दर्शवते.
इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) द्वारे आयोजित "इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम" "जागतिक स्तरावर स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळीची पायाभरणी " या कार्यक्रमादरम्यान या घोषणा करण्यात आल्या.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191062)
Visitor Counter : 7