दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतात डेटा सेंटर्स, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि इंटरकनेक्ट एक्स्चेंजेसच्या स्थापनेद्वारे डेटा अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी नियामक आराखडा' यासंबंधी भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाच्या दि. 18.11.2022 रोजीच्या शिफारशींवर, दूरसंवाद विभागाने दि. 29.08.2025 रोजी अभिप्रायासह परत पाठवलेल्या दस्तावेजावर भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाने प्रतिक्रिया जारी केली आहे
Posted On:
17 NOV 2025 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
भारतात डेटा सेंटर्स, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि इंटरकनेक्ट एक्स्चेंजेसच्या स्थापनेद्वारे डेटा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीचा नियामक आराखड्यासंबंधी ट्राय अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाने दि. 18.11.2022 काही शिफारशी केल्या होत्या. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारितील, दूरसंवाद विभागाने (DoT) दि. 29.08.2025 रोजी या शिफारशींवरील अभिप्रायाची नोंद असलेला दस्तावेज प्राधिकरणाकडे परत पाठवला होता. त्यावर आज भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाने आपली प्रतिक्रिया जारी केली आहे.
यासंदर्भात दूरसंवाद विभागाने भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाच्या शिफारसींवरील अभिप्रायाची नोंद असलेला दस्तऐवज प्राधिकरणाकडे परत पाठवला होता. दि.18.11.2022 रोजीच्या एकूण शिफारशींचा भाग असलेल्या डेटा नैतिकता आणि मालकी (Data Ethics and Ownership) संबंधातील 6.39 आणि 6.40 या शिफारशी सरकारने विचारार्थ घेतल्या असून, या शिफारशींबाबत दूरसंवाद विभागाने व्यक्त केलेली मते जमेस धरून, प्राधिकरणाने संबंधित शिफारशींवर पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
प्राधिकरणाच्या या शिफारशींसंबंधी दूरसंवाद विभागाने व्यक्त केलेल्या मतांचे परीक्षण केल्यानंतर, आता प्राधिकरणाने अभिप्रायासह परत आलेल्या त्या दस्तावेजावील आपला अंतिम प्रतिसाद दिला आहे. हा प्रतिसाद प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (www.trai.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याबाबत कोणतेही स्पष्टीकरण हवे असल्यास किंवा अधिक माहितीसाठी, प्राधिकरणाचे सल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण) अब्दुल कय्यूम यांच्याशी +91-11-20907757 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो.
* * *
नितीन फुल्लुके/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190831)
Visitor Counter : 12