पंतप्रधान कार्यालय
क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यातील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीचे पंतप्रधानांकडून कौतुक
Posted On:
13 NOV 2025 4:30PM by PIB Mumbai
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या जागतिक क्षयरोग अहवाल 2025 मध्ये नमूद केलेल्या क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यातील भारताच्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. 2015 पासून भारताने क्षयरोगाच्या घटनांमध्ये प्रशंसनीय घट नोंदवली असून ती जागतिक घट दरापेक्षा जवळपास दुप्पट आहे आणि जगात कुठेही आढळलेल्या सर्वात मोठ्या घसरणीपैकी एक आहे, असे अहवालात अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी असेही नमूद केले की, या कामगिरीला देशभरात उपचारांचा विस्तार, 'हरवलेल्या रुग्णांच्या' संख्येत घट आणि यशस्वी उपचारांच्या दरात सातत्यपूर्ण वाढ यासारख्या उत्साहवर्धक उपलब्धीचीही जोड मिळाली.
एक्स वरील एका पोस्टमध्ये, मोदी म्हणाले:
“क्षयरोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईला उल्लेखनीय गती मिळत आहे.
2025 च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या 2025 क्षयरोग ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की 2015 पासून भारतात क्षयरोगाच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे आणि ती जागतिक घट दराच्या जवळपास दुप्पट आहे. ही जगात कुठेही आढळलेली सर्वात मोठी घट आहे. उपचारांच्या व्याप्तीचा विस्तार, 'हरवलेल्या रुग्णांच्या प्रकरणांमध्ये ' घट आणि यशस्वी उपचारांमधील सातत्यपूर्ण वाढ ही देखील तितकीच आनंददायी बाब आहे. हे यश मिळवण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. निरोगी आणि तंदुरुस्त भारत सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत!
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2189415
@WHO”
***
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2190268)
Visitor Counter : 5