राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींचा अंगोला दौरा:अंगोलाच्या राष्ट्रपतींसमवेत द्विपक्षीय चर्चा आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चांचे केले नेतृत्व

Posted On: 09 NOV 2025 7:39PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  त्यांच्या अंगोला आणि बोत्सवानाच्या राजकीय दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात, अंगोलाची राजधानी लुआंडा येथे पोहोचल्या. भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला अंगोला दौरा आहे. अंगोला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमनानंतर, अंगोलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री टेटे अँटोनियो यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

आज (9 नोव्हेंबर 2025) राष्ट्रपतींनी लुआंडा येथील राष्ट्रपती भवनातील त्यांच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोंजाल्विस  लॉरेन्को यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले तसेच त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. व्यक्तिगत भेटी आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांविषयी विस्तृत मुद्द्यांवर चर्चा केली.

भारत आणि अंगोला यांच्यातील भागीदारी परस्पर विश्वास, आदर आणि आपल्या लोकांच्या समृद्धीविषयी असणारा सामाईक दृष्टीकोन यांवर आधारित आहे. अंगोलाच्या लोकांची समृद्धी आणि प्रगती हे लक्ष्य ठेवून केल्या जात असणार्‍या अंगोलाच्या विकासात्मक प्रयत्नांविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.

उभय देशांदरम्यानच्या भरभराट होत असलेल्या ऊर्जा व्यापार भागीदारीची राष्ट्रपतींनी नोंद घेतली आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये अंगोला महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही त्यांनी तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि परस्पर लोक देवाणघेवाण यांसारख्या नव्या आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमध्ये वैविध्य आणण्याविषयी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. शिवाय, विविध द्विपक्षीय क्षेत्रांमध्ये तसेच भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदेच्या व्यापक चौकटीअंतर्गत सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्रित काम सुरू ठेवण्यासही सहमती दर्शवली.

यावेळी, मत्स्यपालन, जलचर आणि सागरी संसाधनांमध्ये सहकार्य आणि वकिलातीच्या बाबींमध्ये सहकार्य या संदर्भातील सामंजस्य करारांची परस्पर देवाणघेवाण करण्यात आली.

अंगोलाच्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट मैत्रीगट (IBCA)आणि जागतिक जैवइंधन मैत्रीगटात (GBA) सामील होण्याच्या निर्णयाचे राष्ट्रपतींनी स्वागत केले.

दोन्ही राष्ट्रपतींनी वार्ताहर परिषदेत निवेदन जारी केले. (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वार्ताहर परिषदेतील निवेदनाचा मजकूर जोडला आहे.)

त्यानंतर, अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोंजाल्विस लॉरेन्को यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले.

Please click here to see the President's Speech-

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2188134) Visitor Counter : 5