संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाच्या रोमांचक हवाई प्रात्यक्षिकांनी गुवाहाटी स्तिमित
Posted On:
09 NOV 2025 4:26PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दलाने 93 व्या वर्धापन दिनानिमित्त,आज (9 नोव्हेंबर 2025) गुवाहाटी येथे भव्य ब्रह्मपुत्रा नदीपात्रावर नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके सादर केली . आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा शर्मा, CAS एअर चीफ मार्शल एपी सिंग, पूर्व एअर कमांडचे AOC-in-C एअर मार्शल सुरत सिंग आणि भारतीय हवाई दल आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना हवाई प्रात्यक्षिकांमध्ये समाविष्ट होती:
"Infallible Impervious and Precise"- "अमोघ, अभेद्य व अचूक"
लचित घाटावरून उड्डाण करणाऱ्या लढाऊ, वाहतूक आणि हेलिकॉप्टर विमानांनी गुवाहाटीच्या तेजात भर घातली. या मालिकेत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर, वाहतूक आणि लढाऊ विमानांच्या विस्तृत रेंजचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. राष्ट्रीय स्थितिस्थापकत्वाचे प्रतीक असलेले तेजस, हलके लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे, सी-295 आणि हॉक्स ही प्रमुख आकर्षणे होती. हार्वर्ड, सुखोई 30 आणि राफेल यांनी प्रेक्षकांना चित्तथरारक निम्न-स्तरीय हवाई कौशल्यांनी मंत्रमुग्ध केले. सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमच्या समक्रमित हालचालींनी ही कामगिरी संपन्न झाली.
या उड्डाण प्रदर्शनाने प्रेक्षकांवर विशेषतः ईशान्येकडील तरुणांवर अमीट छाप सोडली. हे तरूण धैर्य आणि शिस्तीच्या प्रदर्शनाने प्रेरित झाल्याचे दिसून आले. निळ्या रंगाच्या पोशाखात पुरूष आणि महिलांमधील अखंड समन्वय पाहून युवा प्रेक्षकांमध्ये अभिमान आणि प्रेरणा जागृत झाली, अनेकांना भारतीय हवाई दलात करिअर करण्याची आणि देशाच्या सेवेत योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.
MGTK.jpg)
I6GL.jpg)

***
सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188061)
Visitor Counter : 11