पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याची झलक केली सामायिक
Posted On:
09 NOV 2025 3:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहरादून येथे उत्तराखंड स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी ₹8140 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि भूमिपूजन केले. पंतप्रधानांनी सांगितले की 9 नोव्हेंबर हा दीर्घ आणि समर्पित संघर्षाचा परिणाम आहे आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या मनात अभिमानाची खोलवर भावना निर्माण करतो.
‘एक्स’वरील मालिकाबद्ध संदेशांमध्ये मोदी म्हणाले:
“डेहराडूनमध्ये उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याशी संबंधित कार्यक्रमात विकासाप्रति लोकांच्या अटळ निर्धाराने मला नवी ऊर्जा प्राप्त झाली.”
“विकसित भारताच्या निर्मितीत उत्तराखंड आपला सशक्त वाटा उचलत आहे. राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भरविण्यात आलेल्या आकर्षक प्रदर्शनात मी त्याच्या विकासप्रवासाचा साक्षी झालो.”
“उत्तराखंडच्या परंपरा, संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करून मला अत्यंत आनंद झाला.”
“उत्तराखंड स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करताना मला प्रचंड अभिमान आणि आनंद वाटला.”
“उत्तराखंडच्या जनतेने अनेक वर्षे जे स्वप्न पाहिले होते, त्या तपस्येचे फळ म्हणजेच 9 नोव्हेंबर हा दिवस आहे. राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बलिदान देणाऱ्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आंदोलनाशी संबंधित सर्वांना सादर नमन करतो.”
“आज जेव्हा उत्तराखंड आपल्या स्थापनेची 25 वर्षे पूर्ण करत आहे, तेव्हा माझा हा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, हा काळ त्याच्या उत्कर्षाचा कालखंड आहे.”
“गेल्या काही वर्षांत उत्तराखंडचा विकासप्रवास अद्भुत राहिला आहे. राज्याने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. हा बदल म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या आपल्या धोरणाचा परिणाम आहे.”
“देवभूमीची खरी ओळख तिच्या आध्यात्मिक शक्तीत आहे. उत्तराखंडने ठरवले तर पुढील काही वर्षांत तो स्वतःला जगाची ‘आध्यात्मिक राजधानी’ म्हणून प्रस्थापित करू शकतो.”
“देशाने आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प केला आहे, त्याचा मार्ग स्थानिकसाठी आग्रही या माध्यमातून निश्चित होईल. उत्तराखंडने हा दृष्टिकोन नेहमीच आत्मसात केला आहे.”
“उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या दुहेरी इंजिनने राज्याच्या विकासप्रवासातील अनेक आव्हानांवर मात केली आहे. तसेच या प्रगतीच्या गतीला अडथळा येऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली आहे.”
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188041)
Visitor Counter : 10