रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्रालयाने "वंदे मातरम्" च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त रेल भवन येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2025 4:22PM by PIB Mumbai
"वंदे मातरम्" च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त, सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, आज रेल भवन येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव; सदस्य (टी अँड आरएस) आर. राजगोपाल; रेल्वे मंडळाच्या सचिव अरुणा नायर; आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या मुख्य कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासह सर्व अधिकाऱ्यांनी "वंदे मातरम्" चे सामूहिक गायन केले.

सामूहिक गायनानंतर, उपस्थित केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांनी पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केलेल्या कार्यक्रमामध्ये झालेले पंतप्रधानांचे भाषण ऐकले.
केंद्रीय मंत्र्यांनी "वंदे मातरम्" हे गेल्या 150 वर्षांपासून भारताच्या चेतनेचा उद्घोष असल्याचे वर्णन केले.
इतर रेल्वे परिमंडळ आणि विभागांमध्ये अशाच प्रकारच्या स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या उपस्थितीत वंदे मातरमच्या 150 व्या वर्षाच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारताच्या राष्ट्रीय चेतनेत खोलवर रुजलेल्या राष्ट्रगानाला आदरपूर्वक वंदन म्हणून हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
***
सुवर्णा बेडेकर/वासंती जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2187638)
आगंतुक पटल : 22