भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान


निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

Posted On: 06 NOV 2025 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्हेंबर 2025

 

  1. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज उत्सवी वातावरणात शांततेत पार पडला. बिहारच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक 64.66% मतदान झाले. (खालील तक्त्यानुसार)
  2. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह थेट वेबकास्टिंगद्वारे मतदानावर बारकाईने लक्ष ठेवले, बिहारमध्ये हे पहिल्यांदाच 100% मतदान केंद्रांवर सुनिश्चित करण्यात आले.
  3. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षातून डीईओ यांच्याशी संवाद साधला.
  4. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले, एकूण मतदारांची संख्या 3.75 कोटींहून अधिक आहे.
  5. बिहारमध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (आईव्हीपी) अंतर्गत, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, फिलीपिन्स, बेल्जियम आणि कोलंबिया या 6 देशांतील 16 प्रतिनिधींनी मतदान प्रक्रिया पाहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सुव्यवस्थित, पारदर्शक, कार्यक्षम आणि सहभागी निवडणुकांपैकी एक म्हणून बिहार निवडणूकीचे प्रतिनिधींनी कौतुक केले.

* मतदानाची आकडेवारी आज रात्री 8.15 वाजेपर्यंत आहे आणि 1,570 अधिकाऱ्यांना ईसीआयनेट वर आकडेवारी अद्ययावत करायची आहे.

  1. अनेक नवीन मतदार-अनुकूल उपक्रमांचा भाग म्हणून, ईव्हीएम मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो पाहून मतदार खूप आनंदी झाले. इतर नवीन उपक्रमांमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिट सुविधा, सहज वाचता येणारी नवीन डिझाइन केलेली मतदार माहिती स्लिप (व्हीआयएस) आणि गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 पर्यंत मतदार यांचा  समावेश होता.
  2. सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक निर्दिष्ट करण्यात आले. दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी ई-रिक्षा सुविधा देखील प्रदान करण्यात आली होती.
  3. जिल्हानिहाय आणि विधानसभा मतदार संघ  निहाय अंदाजे मतदानाचे आकडे ईसीआयनेट अॅपवर उपलब्ध आहेत.

Poll Participation (%age) before Bihar Election 2025

General Election to Lok Sabha (1951 - 2024)

 

General Election to Legislative Assembly of Bihar (1951 - 2020)

Year

Poll Participation (%)

Year

Poll Participation (%)

1951-52

40.35 (Lowest)

1951-52

42.6 (Lowest)

1957

40.65

1957

43.24

1962

46.97

1962

44.47

1967

51.53

1967

51.51

1971

48.96

1969

52.79

1977

60.76

1972

52.79

1980

51.87

1977

50.51

1984

58.8

1980

57.28

1989

60.24

1985

56.27

1991

60.35

1990

62.04

1996

59.45

1995

61.79

1998

64.6 (Highest)

2000

62.57 (Highest)

1999

61.48

2005-Feb

46.5

2004

58.02

2005-Oct

45.85

2009

44.47

2010

52.73

2014

56.26

2015

56.91

2019

57.33

2020

57.29

2024

56.28

 

 

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187173) Visitor Counter : 8
Read this release in: English , Tamil