वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी ब्रासोव्ह येथे झालेल्या भारत-रोमानिया व्यवसायपरिषदेत भारतीय व्यापार शिष्टमंडळाचे केले नेतृत्व
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2025 12:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
बुखारेस्टमधील चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ ब्रासोव्ह (CCIBv) तसेच भारतीय दूतावास आणि भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केलेल्या इंडिया-रोमानिया उद्योग परिषदेत वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज भारतीय उद्योग शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
वाहन उद्योग (ऑटोमोटिव्ह), अंतराळ (एरोस्पेस), संरक्षण, अक्षय ऊर्जा, अभियांत्रिकी सेवा आणि आयसीटी उद्योग यासारख्या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून उभय देशांमधील द्विपक्षीय गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य वाढविणे हे या परीषदेचे उद्दिष्ट होते.
सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारताचे स्थान अधोरेखित करत रोमानियन उद्योगांना मेक इन इंडिया आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत भारताच्या गतिमान उत्पादन आणि नवोन्मेष परिसंस्थेत सहभागी होण्याचे आवाहन आपल्या भाषणात, प्रसाद यांनी केले.
"भारतातील उद्योग व्यवसायातील संधी" या विषयावरील सादरीकरणात अलिकडच्या काळातील धोरणात्मक सुधारणा, व्यवसाय सुलभतेचे उपाय आणि प्रमुख औद्योगिक विभागांत देण्यात येणारी विविध राज्यस्तरीय प्रोत्साहने यांचा आराखडा दाखविण्यात आला. या सत्रात भारतीय आणि रोमानियन कंपन्यांमधील संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान भागीदारी शोधण्यासाठी सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी करण्यात आली आणि एकमेकांशी सुसंगत संवादसत्रे झाली.
ब्रासोव्ह परिषदेद्वारे मध्य आणि पूर्व युरोपसोबत भारताच्या व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे, ज्यामुळे शाश्वत उत्पादन, हरित ऊर्जा आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांमध्ये दिर्घकालीन आर्थिक संबंध निर्माण करण्याच्या दोन्ही राष्ट्रांच्या वचनबद्धतेला दुजोरा मिळाला आहे.
ब्रासोव्ह हे आधुनिक रोमानियाचे प्रतीक आहे - जिथे परंपरा आणि उद्योग नवीन युगातील तंत्रज्ञान एकत्र येते आणि लघु - मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते तसेच नवोपक्रम भरभराटीला येतात. हे तत्त्व मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या भारताच्या दृष्टिकोनाशी जुळणारे आहे, आणि एमएसएमई आणि स्टार्ट-अप्स सर्वसमावेशक विकासाचे इंजिन म्हणून काम करतात. ब्रासोव्हची औद्योगिक ताकद आणि भारताच्या उत्पादन, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षमता यांच्यात सहकार्याला प्रचंड वाव आहे.
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186594)
आगंतुक पटल : 23