पंतप्रधान कार्यालय
श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2025 12:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला अनंत काळ ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहेत,असे मोदी यांनी म्हटले आहे. "करुणा, समानता, नम्रता आणि सेवा यांची त्यांनी दिलेली शिकवण खूप प्रेरणादायी आहेत", असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे .
आपल्या एक्स पोस्टवर मोदींनी म्हटले आहे:
"श्री गुरु नानक देवजी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला अनंत काळ ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहेत. करुणा, समानता, नम्रता आणि सेवा ही त्यांची शिकवण खूप प्रेरणादायी आहेत. त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा. त्यांचा देदीप्यमान प्रकाश आपल्या धरणीला सदैव प्रकाशमान करत राहो."
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186592)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam