संरक्षण मंत्रालय
राज कुमार अरोरा यांनी संरक्षण सेवा वित्तीय सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2025 9:41AM by PIB Mumbai
भारतीय संरक्षण लेखा सेवा 1990 च्या तुकडीचे अधिकारी राज कुमार अरोरा यांनी आज 1 नोव्हेंबर 2025 रोजी संरक्षण सेवा वित्तीय सल्लागार या पदाचा कारभार स्वीकारला. संरक्षण अधिग्रहण, आर्थिक धोरण, लेखा, लेखापरीक्षा, अर्थसंकल्प, आणि कर्मचारी व्यवस्थापन या क्षेत्रांमधील दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
NIML.jpg)
अरोरा यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेचे वित्त व्यवस्थापक (वायुदल) आणि वित्त मंत्रालयातील संचालक या पदांचा समावेश आहे. तसेच त्यांनी आयुध कारखाना मंडळात सदस्य (वित्त) आणि संरक्षण लेखा विभागातील विविध कमांड व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकात्मिक वित्तीय सल्लागार म्हणून देखील कार्य केले आहे.
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185271)
आगंतुक पटल : 31