सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय समुदायांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केला सामंजस्य करार

Posted On: 30 OCT 2025 10:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने, अनुसूचित जाती (एससी) आणि मागासवर्गीय (बीसी) समुदायातील उमेदवारांकरिता रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी भारतातील आघाडीची मनुष्यबळ आणि स्टाफिंग सोल्युशन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या मे.पर्सोलकेली इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे

या अंतर्गत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय उमेदवारांना विविध क्षेत्रातील योग्य नोकरीच्या संधींशी जोडण्यासाठी व्यावसायिक मनुष्यबळ सल्लागारांसोबत भागीदारी करत आहे. प्लेसमेंट सुलभ करण्यासाठी सत्यापित उमेदवारांचा डेटा मनुष्यबळ(एचआर) भागीदारासोबत सामायिक केला  जाईल.  लाभार्थ्यांना मोफत समुपदेशन, रिज्युम साहाय्य, मुलाखतीची तयारी आणि प्लेसमेंट सहाय्य मिळेल. हे सहकार्य नियमित देखरेखीद्वारे कठोर डेटा गोपनीयता, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करते. यामुळे उमेदवारांची रोजगारक्षमता सुधारेल.

या प्रसंगी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या सचिवांनी आपले मनोगत व्यक्त केले,   "ही भागीदारी सामाजिक न्यायाचे आर्थिक सक्षमीकरणात रूपांतर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उपेक्षित समुदायांमधील सत्यापित उमेदवारांना कुशल मनुष्यबळ  भागीदारांशी जोडून, आम्ही एक पारदर्शक आणि समावेशक रोजगार परिसंस्था तयार करत आहोत जी प्रत्येक पात्र व्यक्तीसाठी संधीची नवी कवाडे खुली करेल."

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि मे. पर्सोलकेली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील सहयोग, हा  समावेशक रोजगार आणि सामाजिक समता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कल्याण आणि कार्यदल  यांच्यातले अंतर कमी करून, हा उपक्रम सक्षमीकरण हे सर्वांसाठी खऱ्या अर्थाने उपजीविका, प्रतिष्ठा आणि स्वावलंबनात रूपांतरित होते याची सुनिश्चिती करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.

 

* * *

शैलेश पाटील/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184420) Visitor Counter : 6