रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएचएआय ने फास्टॅग वापरकर्त्यांसाठी आपले वाहन जाणून घ्या (केवायव्ही) प्रक्रिया केली सोपी

Posted On: 30 OCT 2025 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2025

 

ग्राहकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या एकूण अनुभव द्विगुणित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने फास्टॅग वापरकर्त्यांसाठी "आपले वाहन जाणून घ्या (केवायव्ही) प्रक्रिया सोपी केली आहे. भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) ने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार, अनुपालन न करणाऱ्या वाहनांसाठी फास्टॅग सेवा बंद केल्या जाणार नाहीत आणि वापरकर्त्यांना केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल.

सोप्या केवायव्ही मार्गदर्शक तत्वांनुसार, कार/जीप/व्हॅनचे बाजूचे फोटो आता आवश्यक राहणार नाहीत. केवळ नंबर प्लेट आणि फास्टॅग  दर्शविणारा समोरचा फोटो अपलोड करणे आवश्यक असेल. तसेच, वापरकर्ता वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करतो तेव्हा वाहनाकडून स्वयंचलितपणे आरसी विवरण  मिळविण्याची तरतूद केली जाईल. जर एकाच मोबाइल क्रमांकावर अनेक वाहने नोंदणीकृत असतील, तर वापरकर्ता ते वाहन निवडू शकेल ज्या वाहनासाठी त्याला केवायव्ही पूर्ण करायचे आहे.

सेवा सुरू ठेवण्यासाठी, केवायव्ही धोरणापूर्वी जारी केलेले फास्टॅग्स तोपर्यंत सक्रिय राहतील जोवर टॅग्ज सुटल्याच्या  किंवा गैरवापर झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत नाहीत. तसेच, जारीकर्ता बँका वापरकर्त्यांना केवायव्ही पूर्ण करण्यासाठी एसएमएस स्मरण संदेश पाठवतील.

जर वापरकर्त्याला कोणत्याही कारणास्तव कागदपत्रे अपलोड करण्यात अडचण येत असेल, तर जारीकर्ता बँक कनेक्शन कापण्यापूर्वी ग्राहकाशी संपर्क साधेल आणि केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करेल. ग्राहक त्यांच्या जारीकर्ता बँकेशी केवायव्हीशी संबंधित कोणत्याही समस्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन क्रमांक  1033 वर तक्रारी नोंदवू शकतात किंवा प्रश्न विचारू  शकतात.

केवायव्ही नियमांचे हे सरलीकरण वापरकर्त्याचा अनुभव समृद्ध करण्यासाठी, फास्टॅग प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवरील राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना सुरळीत आणि वेगवान अनुभव प्रदान करण्याप्रति एनएचएआयच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184399) Visitor Counter : 7