पोलाद मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2026 च्या सहामाहीचे आर्थिक अहवाल केले जाहीर; उत्तम प्रत्यक्ष आणि आर्थिक कार्यवाहीचे केले प्रदर्शन 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2025 2:15PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2025
 
महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीच्या महारत्न, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) ने आज 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या अर्धसहामाहीचे  (H1 FY’26) आपले  आर्थिक अहवाल जाहीर केले. उद्योगाने केलेली शाश्वत उत्तम  कामगिरी आणि सुधारीत लाभाचे प्रदर्शन याद्वारे दिसून आले आहे.
महत्त्वपूर्ण मुद्दे:
	- 9.5 दशलक्ष टन कच्च्या पोलादाचे स्थिर उत्पादन यंदाही  कायम राहिले
- किरकोळ आणि इतर ग्राहकांपर्यंत कंपनी पोहोचल्याने विक्रीचे प्रमाण  16.7% ने वाढले आहे.
- किंमतीचे  आव्हाने असूनही विक्रीचे प्रमाण वाढल्याने प्रत्यक्ष कामगिरीतून  मिळणारा महसूल 52,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक  आहे.
- कर वजा करून  नफा (PAT) ~32%, ने वाढला असून जो  उत्कृष्ट कार्यक्षमता आणि अनुकूल  खर्च झाल्याचे अधोरेखित करतो.
- मार्च 23 च्या पूर्वीच्या पातळीकडे पूर्ण क्षमतेने जाण्याचे  प्रयत्न केल्याने कर्जाची रक्कम 26427 कोटी रुपयांपर्यंत कमी झाली.
आर्थिक वर्ष 2026 सहामाही अहवाल एका दृष्टिक्षेपात 
	
		
			| युनीट | H1 24-25 | H1 25-26 |   | 
		
			| कच्च्या पोलादाचे उत्पादन | दशलक्ष टन | 9.46 | 9.50 | 
		
			| विक्रीचे प्रमाण | दशलक्ष टन | 8.11 | 9.46 | 
		
			| कामकाजातून मिळणारा महसूल | कोटी रुपये | 48,672 | 52,625 | 
		
			| व्याज, कर, मूल्यह्रास आणि कर्जरोखेपूर्वीची कमाई (EBITDA) | कोटी रुपये | 5,593 | 5,754 | 
		
			| अपवादात्मक वस्तू आणि करांपूर्वीचा नफा | कोटी रुपये | 1,439 | 1,781 | 
		
			| अपवादात्मक वस्तू | कोटी रुपये | (312) | (338) | 
		
			| करपूर्व नफा (PBT) | कोटी रुपये | 1,127 | 1,443 | 
		
			| करानंतरचा नफा (PAT) | कोटी रुपये | 844 | 1,112 | 
	
 
या प्रसंगी बोलताना, सेलचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक म्हणाले:
आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीतील सेलची कामगिरी उत्पादन आणि आर्थिक दोन्ही बाबतीत सातत्य दर्शवते. कंपनीने स्थिर उत्पादनासाठी उच्च क्षमतेचा वापर करण्यात सातत्य ठेवले आहे. जागतिक पोलाद बाजारपेठेत अस्थिरता असूनही, सेलच्या दृढनिश्चयाने आणि सामूहिक प्रयत्नांमुळे, आम्ही विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ साध्य केली आहे. कार्यक्षमता सुधारणा आणि तर्कसुसंगत खर्च करणाच्या दिशेने चाललेल्या मोहिमेसह, हे मजबूत आर्थिक कामगिरीमध्ये रूपांतरित झाले.
भारत कमी-कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वैविध्यपूर्ण उत्पादने, ग्राहक-केंद्रित धोरणे, डिजिटलायझेशन आणि सतत सुरू असलेल्या प्रयत्नांना पूरक म्हणून आपल्या नवनवीन संकल्पनांच्या विस्ताराद्वारे शाश्वत नफा सुनिश्चित करत  सेल या परीवर्तनातून योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.
 
* * *
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2184115)
                Visitor Counter : 7