कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2025
पंतप्रधान पुरस्कार पोर्टलवर 1215 तर
जिल्ह्यांच्या समग्र विकास श्रेणीसाठी 442 जिल्ह्यांनी केली नोंदणी
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2025 योजनेच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली 29.10.2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकीय सुधारणा सचिव आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
पंतप्रधान पुरस्कार केंद्र आणि राज्य सरकारांच्या जिल्हा/संघटनांनी केलेल्या असाधारण आणि अभिनव कार्याची दखल घेणे, मान्यता देणे आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी दिले जातात. 2025 वर्षासाठी, तीन पुरस्कार श्रेणी आहेत:-
- श्रेणी 1 - 11 प्राधान्य क्षेत्रातील योजनांमध्ये जिल्ह्यांचा समग्र विकास
- श्रेणी 2 - आकांक्षी तालुके कार्यक्रम
- श्रेणी 3 - नवोन्मेष (केंद्र/राज्य/जिल्हा)
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2025 अंतर्गत 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत, एकूण
1,215 नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यांच्या समग्र विकास श्रेणी अंतर्गत 442, आकांक्षी तालुके कार्यक्रम अंतर्गत 295, नवोन्मेष (जिल्हा) अंतर्गत 370, नवोन्मेष (राज्य) अंतर्गत 58 आणि नवोन्मेष (केंद्र) श्रेणी अंतर्गत 50 नोंदणींचा समावेश आहे.
पंतप्रधान पुरस्कार वेब पोर्टलवर (https://pmawards.gov.in/) नोंदणी आणि नामांकने सादर करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे.

* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183901)
आगंतुक पटल : 20