पंतप्रधान कार्यालय
माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेला संवाद फलदायी होता: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे: पंतप्रधान मोदी
Posted On:
06 NOV 2024 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विविध क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
माझे मित्र राष्ट्राध्यक्ष @realDonaldTrump यांच्याशी झालेला संवाद फलदायी होता. त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे."
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183883)
Visitor Counter : 6
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam