पंतप्रधान कार्यालय
आदिवासी गौरव दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी बिहारला देणार भेट
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या उत्सवाची होणार सुरुवात
पंतप्रधान 6640 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी
आदिवासी समुदायांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन करण्यासाठी दोन ‘आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालये’ आणि दोन ‘आदिवासी संशोधन संस्थां’चे पंतप्रधान करणार उद्घाटन
आदिवासी समुदायांचे जीवनमान सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक प्रकल्पांचा होणार प्रारंभ
पंतप्रधान-जनमान योजने अंतर्गत बांधलेल्या 11,000 घरांच्या गृहप्रवेशात पंतप्रधान होणार सहभागी
Posted On:
13 NOV 2024 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी, आदिवासी गौरव दिन साजरा करण्यासाठी बिहारमधील जमुईला भेट देणार आहेत. यावेळी ‘धरती आबा भगवान बिरसा मुंडा’ यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या उत्सवाची सुरुवात होत आहे. सकाळी 11 वाजता, भगवान बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ एका विशेष नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधानाच्या हस्ते केले जाणार आहे. आदिवासी समुदायांच्या उन्नतीसाठी तसेच या प्रदेशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 6,640 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत.
प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महा अभियान (पीएम-जनमन) अंतर्गत बांधलेल्या 11,000 आवासांच्या गृह प्रवेश कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होतील. आदिवासी भागात आरोग्य सेवा सुविधा वाढविण्यासाठी पीएम-जनमन अंतर्गत सुरू केलेल्या 23 फिरते आरोग्य केंद्र (एमएमयू) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत अतिरिक्त 30 फिरते आरोग्य केंद्रांचे उद्घाटन देखील पंतप्रधान करतील.
आदिवासी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपजीविका निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी 300 वन धन विकास केंद्रे (व्हीडीव्हीके) आणि आदिवासी विद्यार्थ्यांना समर्पित सुमारे 450 कोटी रुपयांच्या 10 एकलव्य मॉडेल निवासी शाळांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे करतील. आदिवासी समुदायांच्या समृद्ध इतिहास आणि वारशाचे दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि जबलपूर येथे दोन आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालये तसेच जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर आणि सिक्कीममधील गंगटोक येथे दोन आदिवासी संशोधन संस्थांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आदिवासी क्षेत्रांमध्ये संपर्क सुधारण्यासाठी 500 किमी नवीन रस्त्यांच्या बांधकामाचे आणि पंतप्रधान जनमान अंतर्गत समुदाय केंद्र म्हणून काम करण्यासाठी 100 बहुउद्देशीय केंद्रे (एमपीसी) यांची पायाभरणी पंतप्रधान करतील. याशिवाय, आदिवासी मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची आपली वचनबद्धता पुढे नेण्यासाठी पंतप्रधान सुमारे 1,110 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या 25 नवीन एकलव्य मॉडेल निवासी शाळांची पायाभरणी देखील करतील.
पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देतील, ज्यामध्ये पंतप्रधान जनमान अंतर्गत सुमारे 500 कोटी रुपयांचे 25,000 नवीन घरे आणि धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) अंतर्गत 1960 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची 1.16 लाख घरे यांचा समावेश आहे. यासोबतच, पंतप्रधान जनमान योजना अंतर्गत 66 वसतिगृहे आणि धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) अंतर्गत 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची 304 वसतिगृहे; पंतप्रधान जनमन योजने अंतर्गत 50 नवीन बहुउद्देशीय केंद्रे, 55 फिरती वैद्यकीय युनिट आणि 65 अंगणवाडी केंद्रे; सिकलसेल ॲनिमिया निर्मूलनासाठी 6 विशेष केंद्रे तसेच धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) अंतर्गत आश्रम शाळा, वसतिगृहे, सरकारी निवासी शाळा इत्यादींच्या उन्नतीसाठी 330 प्रकल्प, ज्यांचे मूल्य सुमारे 500 कोटी रुपये आहे, यांचाही त्यात समावेश आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183875)
Visitor Counter : 7
Read this release in:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada