पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला
Posted On:
29 OCT 2025 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान सानई ताकाईची यांनी पदभार ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
आर्थिक सुरक्षितता, संरक्षण सहकार्य तसेच प्रतिभेच्या गतिशीलतेवर अधिक लक्ष केंद्रित करून भारत-जपान विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारी आणखी वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी त्यांच्या सामायिक संकल्पनांबाबत चर्चा केली.
अधिक सशक्त भारत-जपान संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत यावर दोन्ही नेत्यांनी अनुमोदन दिले.
एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद झाला. पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आर्थिक सुरक्षितता, संरक्षण सहकार्य तसेच प्रतिभेच्या गतिशीलतेवर अधिक लक्ष केंद्रित करून भारत-जपान विशेष धोरणात्मक तसेच जागतिक भागीदारी आणखी वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. अधिक सशक्त भारत-जपान संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत यावर आमचे एकमत झाले.
@takaichi_sanae”
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183738)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam