कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष 5.0 मोहिमेचा मध्यावधी आढावा

Posted On: 27 OCT 2025 10:18AM by PIB Mumbai

प्रलंबित बाबींच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम 5.0 (SCDPM 5.0) चा भाग म्हणून, सेवानिवृत्ती आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) प्रलंबित बाबी कमी करणे, स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, अंतर्गत देखरेख वाढवणे आणि नोंदींचे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

24 ऑक्टोबर 2025 पर्यंत या मोहिमेच्या मध्यापर्यंत साध्य केलेली कामगिरी खालीलप्रमाणे आहेः

  • सार्वजनिक तक्रारी  आणि त्यांचा निपटारा: लक्ष्यित सार्वजनिक तक्रारी (अपीलसह) पैकी अंदाजे 83% तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे (7500 च्या निर्धारित उद्दिष्टांपैकी 6,166 तक्रारींचे निवारण करण्यात आले.).
  • फाईलचा आढावा आणि नष्ट करणे: आढावा घेण्यासाठी निवडल्या गेलेल्या प्रत्यक्ष कागदपत्रांच्या स्वरुपातील 2,409  फायलींपैकी, 100%  प्रत्यक्ष फायलींवर (261 फाईल्स)  काढून टाकण्याची  प्रक्रिया पूर्ण झाल्याने जागा मोकळ्या झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, 5,300 ई-फायलींचा आढावा घेण्यात आला आणि त्यापैकी 31 ई-फाईल ई-कचरा (e-waste) नियमांचे अनुपालन करण्यासाठी निवडण्यात आल्या.
  • स्वच्छता मोहीम: देशभरातील  निवडण्यात आलेल्या 59 ठिकाणांवर मोहीम राबविण्यात आली, ज्यात स्वच्छता ही सेवा उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला गेला. यात 1 ऑक्टोबर 2025  रोजी राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील वृक्षारोपण मोहिमेचाही समावेश आहे.

'नियमसुलभतेच्या माध्यमातून ' जीवनसुलभता सुनिश्चित करण्यासाठी आणि आपल्या परिसरात सातत्याने स्वच्छता राखण्यासाठी विभाग वचनबद्ध आहे.

***

NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182869) Visitor Counter : 14