विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने (एएनआरएफ) आयसीएमआर आणि गेट्स फाउंडेशनसोबत केला महा मेडटेक मिशनचा प्रारंभ
Posted On:
25 OCT 2025 3:26PM by PIB Mumbai
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने (एएनआरएफ) आयसीएमआर आणि गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने ‘महा- मेडटेक मिशन’ अर्थात वैद्यकीय तंत्रज्ञानातील उच्च प्रभाव क्षेत्रातील प्रगतीसाठी मिशनचा प्रारंभ केला आहे. भारताच्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देणे, महागड्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, आणि परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाची सर्वांना समानतेने उपलब्धता सुनिश्चित करणे हा या ऐतिहासिक उपक्रमाचा उद्देश आहे.
शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास (R&D) संस्था, रुग्णालये, स्टार्ट अप्स, एमएसएमई, मेडटेक उद्योग यांच्यासह व्यापक प्रमाणातील संस्थांना हे मिशन अर्थसाहाय्याचे पाठबळ मिळवून देईल आणि त्यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित करेल. बाजारपेठेत प्रभावी वैद्यकीय तंत्रज्ञानाचे पर्याय देणाऱ्या प्रकल्पांना हे मिशन मोठ्या प्रमाणात म्हणजे 5 ते 15 कोटी रुपये प्रति प्रकल्प (आणि अपवादात्मक स्थितीत 50 कोटी रुपयांपर्यंत) अर्थसाहाय्याचे पाठबळ देईल.
प्रमुख उद्दिष्टे
गंभीर आजारांवर(जास्त प्राधान्याच्या) उपचारांचे पर्याय देणाऱ्या आणि सुरक्षित, उत्तम प्रकारची निगा राखण्याचे जास्त पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या तंत्रज्ञानाला पाठबळ देऊन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रभावी उपाययोजनांना चालना देणे,
कमी खर्चिक उपाययोजनांना पाठबळ देऊन परवडण्याजोग्या औषधोपचारांची उपलब्धता सुनिश्चित करणे, आणि
स्वदेशी वैद्यकीय तंत्रज्ञान विकास, उत्पादन आणि उद्योग-शैक्षणिक संस्था सहकार्याला चालना देऊन स्वयंपूर्णता आणि स्पर्धात्मकतेत वाढ करणे.
मिशनची व्याप्ती
या मिशनमध्ये नवोन्मेषी वैद्यकीय उपकरणांच्या, आणि उपकरणे आणि महत्त्वाचे भाग यांच्यासह इन-व्हिट्रो निदान, अवयवरोपण, सहाय्यक आणि शल्यक्रियाविषयक उपकरणे, कन्झ्युमेबल्स आणि सॉफ्टवेअर-आधारित वैद्यकीय उपाय अशा अनेक प्रकारच्या उपकरणांचा आणि सामग्रीचा समावेश असेल. यामध्ये डायग्नोस्टिक इमेजिंग, मिनिमली इन्वेजिव्ह टेक्नॉलॉजी, पॉइंट ऑफ केअर मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, एआय/एमएल एनेबल्ड प्लॅटफॉर्म्स, रोबोटिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश (पण तेवढ्यापुरता मर्यादित नसेल) असू शकेल. क्षयरोग, कर्करोग, नवजात अर्भकाची काळजी, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादींसारख्या राष्ट्रीय आरोग्य प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांशी संलग्न असलेल्या प्रकल्पांना या मिशनमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
अर्थसहाय्याव्यतिरिक्त हे मिशन, पेटंट मित्र (बौद्धिक संपदा संरक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरण), मेडटेक मित्र (नियामक मार्गदर्शन आणि मंजुरी), क्लिनिकल ट्रायल नेटवर्क (क्लिनिकल प्रमाणीकरण आणि पुरावा निर्मिती) यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांच्या माध्यमातून पूरक पाठबळ तसेच उद्योग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देईल.
अर्जाची प्रक्रिया आणि वेळापत्रक
या मिशनसाठी दोन टप्प्यांच्या आवेदनप्रक्रियेचा अवलंब केला जाईलः
संकल्पना टीप (Concept Notes): प्रकल्पांची छाननी आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी 15 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील. अर्ज ANRF पोर्टल: www.anrfonline.in द्वारे स्वीकारले जातील.
संपूर्ण प्रस्ताव : या विशिष्ट उद्देशासाठी स्थापन केलेल्या समितीने निवडलेल्या संकल्पना प्रस्तावांना संपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची परवानगी दिली जाईल. सादर करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2025 मध्ये सुरू होईल.
अधिक तपशीलांसाठी, कृपया 'महा मेडटेक मिशन' योजनेच्या पेजला भेट द्या: https://anrfonline.in/ANRF/maha_medTech?HomePage=New
***
माधुरी पांगे / शैलेश पाटील / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182454)
Visitor Counter : 33