इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीने ‘आधार’चा शुभंकर तयार करण्यासाठी भारताच्या सर्जनशील व्यक्तींना केले आमंत्रित - 1 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस! 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार
हा शुभंकर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा दृश्य दूत म्हणून काम करणार,
हा शुभंकर ठरणार आधारची सेवा, सुरक्षा आणि सर्व वयोगटांसाठीची सुलभता तसेच विश्वासार्हता, सर्वसमावेशकता, सक्षमीकरण आणि डिजिटल नवोन्मेष या मूलभूत मूल्यांचे प्रतीक
Posted On:
17 OCT 2025 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) MyGov या व्यासपीठावरून देशव्यापी शुभंकर रचना स्पर्धेची (Mascot Design Contest) घोषणा केली आहे. याअंतर्गत नागरिकांना रहिवाशांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणासाठी अधिकृत शुभंकर तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. विश्वास, सर्वसमावेशकता, सक्षमीकरण आणि डिजिटल नवोन्मेष या आघारच्या मूल्यांचे प्रतिक ठरेल असा एक अद्वितीय आणि संस्मरणीय शुभंकर तयार करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
हा शुभंकर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा दृश्य स्वरुपातील दूत म्हणून काम करेल, यासोबतच या शुभंकराच्या माध्यमातून सर्व वयोगटांशी साधला जाणारा संवाद अधिक आपलेपणाचा आणि थेट भिडणारा असावा अशी अपेक्षा आहे. हा शुभंकर आधारची सेवा, सुरक्षा आणि सुलभतेच्या भावनांचे प्रतीक असावा, तसेच त्याद्वारे आधारशी संबंधित माहिती सुलभतेने मांडण्यात मदत व्हावी अशी त्याची रचना असणे अपेक्षित आहे.
या स्पर्धेत सर्व भारतीय नागरिक व्यक्तीगत तसेच संघ म्हणून भाग घेऊ शकतात. स्पर्धकांनी आपले डिझाइन केवळ MyGov वरील स्पर्धेच्या पानावर अपलोड करूनच सादर करायचे आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या शुभंकराचे डिझाईन, त्याचे नाव आणि त्यासंबंधीच्या संक्षिप्त संकल्पना टिप्पणीसह सादर करायचे आहे. सादर केलेल्या डिझाइनचे मूल्यमापन सर्जनशीलता, अस्सलपणा, सौंदर्यपूर्णता आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचाच्या मूल्यांशी सुसंगतता याआधारे केले जाईल.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. याअंतर्गत प्रथम पारितोषिकासाठी 50,000 रुपये, त्यानंतर द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसाठी अनुक्रमे 30,000 रुपये आणि 20,000 रुपये, तसेच मान्यता प्रमाणपत्रे दिली जातील. याव्यतिरिक्त, शुभंकराच्या नावासाठीच्या उत्कृष्ट स्पर्धकांनाही पुरस्कृत केले जाणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण जनतेला त्यांची सृजनशीलता प्रत्यक्षात आणण्यासाठी तसेच आधारच्या समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या प्रवासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सहभागासाठी,या दुव्याला भेट द्या
https://innovateindia.mygov.in/uidai-mascot-competition/ .
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180526)
Visitor Counter : 11