उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींची घेतली भेट; व्यापार आणि तंत्रज्ञान सहकार्य केले अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2025 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती निवासात, भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले ब्राझीलचे उपराष्ट्रपती आणि विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्री, गेराल्डो अल्कमिन यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि ब्राझीलमधील व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आशावाद व्यक्त केला. त्यांनी ऊर्जा सहकार्य वाढवणे, औषधनिर्माण आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारी अधिक दृढ करणे, तसेच संशोधन व नवोन्मेषामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर चर्चा केली.
या चर्चेत संपर्क सुधारण्यावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटायझेशन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यता तपासण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2180162)
आगंतुक पटल : 32