संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे ब्राझीलचे उपराष्ट्रपती आणि संरक्षणमंत्र्यांसोबत बैठक
Posted On:
15 OCT 2025 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंतेरो फिल्हो देखील उपस्थित होते.

नेत्यांनी संरक्षणाशी संबंधित सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संरक्षण उपकरणांचा सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या संधींचा धांडोळा घेण्यासह संयुक्त कार्यासाठी प्राधान्य क्षेत्रे निवडली.


भारत आणि ब्राझीलमध्ये धोरणात्मक भागीदारी आहे. नेत्यांनी संयुक्त सराव आणि प्रशिक्षण भेटींसह उभय लष्करादरम्यान आदानप्रदानावर लक्ष केंद्रित करून संरक्षण सहकार्य वाढविण्याच्या त्यांच्या सामायिक बांधिलकीस सहमती दर्शवली.
शैलेश पाटील/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179699)
Visitor Counter : 4