गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या बोलीला राष्ट्रकुल संघटनेने मान्यता दिल्याबद्दल केला आनंद व्यक्त
भारताला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांना मिळाले समर्थन
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे आणि देशभरातील क्रीडा प्रतिभेचा समूह निर्माण करून पंतप्रधान मोदी यांनी भारताला बनवले एक अद्भुत क्रीडा स्थळ
Posted On:
15 OCT 2025 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या बोलीला राष्ट्रकुल संघटनेने मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका प्रतिक्रियेमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की,"भारतासाठी हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. अहमदाबादमध्ये 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या दाव्याला राष्ट्रकुल संघटनेने मान्यता दिल्याबद्दल देशातील प्रत्येक नागरिकाचे हार्दिक अभिनंदन. भारताला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेले हे एक मिळालेले मोठे समर्थन आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे आणि देशभरातील क्रीडा प्रतिभेचा समूह उभारणे यामुळे पंतप्रधान मोदी यांनी भारताला क्रीडा स्थळाचा एक अद्भुत भाग बनवले आहे."
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179697)
Visitor Counter : 4