संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल आणि इंडोनेशियाचे नौदल यांचे विशाखापट्टणम येथे 'समुद्र शक्ती' - 2025 या द्विपक्षीय सरावाच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन
Posted On:
15 OCT 2025 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
भारतीय नौदलाने 14 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशाखापट्टणम येथे भारत-इंडोनेशिया संयुक्त द्विपक्षीय सागरी सराव 'समुद्र शक्ती - 2025' च्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन केले आहे. सहभागी तुकड्यांमध्ये ईस्टर्न नेव्हल कमांड (ईएनसी) च्या नेतृत्वाखालील ईस्टर्न पथकाचे अँटी-सबमरीन वॉरफेअर कॉर्व्हेट आयएनएस कवरत्ती आणि इंटिग्रल हेलिकॉप्टरसह इंडोनेशियाच्या नौदलाचे जहाज केआरआय जॉन ली यांचा समावेश आहे. विशाखापट्टणम येथे पोहोचलेल्या कॉर्व्हेटचे (इंटिग्रल हेलिकॉप्टरसह) स्वागत ईएनसीने केले.
‘हार्बर’ क्षेत्रामध्ये सौहार्द आणि व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश आहे ज्यामध्ये ‘क्रॉस डेक’ भेटी, संयुक्त योग सत्रे, मैत्रीपूर्ण क्रीडा सामने, व्यावसायिक विषय तज्ज्ञ देवाणघेवाण (एसएमईई) यांचा समावेश आहे. सागरी टप्प्यात हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, हवाई संरक्षण सराव, शस्त्रास्त्र गोळीबार कवायती, भेट, बोर्ड, शोध आणि जप्ती (व्हीबीएसएस ) सराव यासह सामरिक समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने गतिमान आणि गुंतागुंतीच्या सागरी मोहिमांचा समावेश असेल.
‘समुद्र शक्ती’ सराव हा द्विपक्षीय सहभागाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे, परस्पर समज मजबूत करणे आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे. हा सराव भारत-प्रशांत प्रदेशात स्थिरता आणि शांतता राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या सामायिक वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
(9)10CV.jpeg)
(9)SB6B.jpeg)
(6)DG0F.jpeg)
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179398)
Visitor Counter : 17