श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओने नवीन ईसीआर भरण्याची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली
Posted On:
13 OCT 2025 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सुधारित इलेक्ट्रॉनिक चलन-आणि -विवरणपत्र (ईसीआर) प्रणालीची सुरुवात केली असून ही प्रणाली सप्टेंबर 2025 या वेतन महिन्यापासून लागू होणार आहे. ईपीएफओच्या नियोक्ता पोर्टलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचा वापरकर्ता अनुभव सुलभीकृत आणि अचिक चांगला करण्याच्या उद्देशाने ही सुधारित प्रणाली लागून करण्यात आली आहे.
मात्र, सुधारित ईसीआरच्या नव्या वैशिष्ट्यांशी जुळवून घेण्यात आणि पर्यायाने आस्थापनांद्वारे परतावे भरण्याच्या कामात येत असलेल्या अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या विनंतीचा विचार करून सप्टेंबर 2025 या वेतन महिन्यासाठीचे ईसीआर भरण्याची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित इलेक्ट्रॉनिक ईसीआर प्रणालीकडे निर्वेध स्थित्यंतर घडणे सोपे व्हावे यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशभरातील कर्मचारी तसेच उद्योगांच्या प्रतिनिधींसाठी जागरुकता कार्यक्रमांची मालिका देखील हाती घेतली आहे.
केंद्रीय स्तरावर, ईपीएफओने भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय- फिक्की), पीएचडी वाणिज्य आणि उद्योग मंडळ (पीएचडीसीसीआय), भारतीय नियोक्ता महासंघ (ईएफआय) यांसारख्या महत्त्वाच्या उद्योग संस्थांसह बैठका घेऊन त्यांना सुधारित ईसीआर प्रणालीची नवी वैशिष्ट्ये आणि पद्धतीतील सुधारणा यांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चांमध्ये सुधारित डाटा अचूकता, अनुक्रमिक परतावा प्रमाणीकरण आणि अधिक चांगल्या नियमपालन सुविधांसह नव्या परतावा भरणा पद्धतीच्या फायद्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
या प्रसार कार्यक्रमाचा ओघ पुढे सुरु ठेवत, ईपीएफओच्या क्षेत्रीय आणि प्रादेशिक कार्यालयांनी देखील नियोक्ते आणि आस्थापनांच्या प्रतिनिधींसोबत आंतरसंवादात्मक सत्रे आणि कार्यशाळा घेतल्या.आस्थापनांना मुलभूत स्तरावर हातमिळवणीविषयक पाठबळ पुरवणे तसेच सुधारित प्रणालीच्या अंतर्गत परतावे वेळेवर आणि अचूक पद्धतीने भरले जावेत हा या कार्यक्रमांचा उद्देश आहे.
कर्मचाऱ्यांना अडचणीविरहित डिजिटल अनुभव सुनिश्चित करणे तसेच भविष्य निर्वाह निधीच्या प्रशासनात पारदर्शकता आणि नियम पालन आणखी मजबूत करणे याप्रती ईपीएफओ सदैव वचनबद्ध आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178717)
Visitor Counter : 8