वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा भारताच्या पायाभूत सुविधा आणि विकासात्मक दूरदृष्टीवरील परिवर्तनकारी परिणाम केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केला अधोरेखित
केंद्रीय मंत्री गोयल यांनी उन्नत नियोजन तसेच निर्णय घेण्यासाठी एकीकृत भूअवकाशीय इंटरफेसच्या माध्यमातून पंतप्रधान गतिशक्ती डाटाबेसपर्यंत सार्वजनिक पोहोच सुरु करण्याची घोषणा केली
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते एनएमपी डॅशबोर्ड, ऑफशोअर विकास नियोजन मंच, वास्तव वेळेतील डाटा व्यवस्थापन प्रणाली, आकांक्षित जिल्ह्यांसाठी जिल्हा महा योजना तसेच लॉजिस्टिक्स विषयक उत्कृष्टतेसाठी लीप्स 2025 यांची सुरुवात
Posted On:
13 OCT 2025 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान गतिशक्ती महायोजनेच्या (एनएमपी) अंमलबजावणीला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी चार वर्षांपूर्वी याच दिवशी सुरु करण्यात आलेल्या या पथदर्शी उपक्रमाचा परिवर्तनकारी प्रभाव अधोरेखित केला.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेने संबंधित क्षेत्रांमध्ये वेग तसेच बळकटी दोन्ही आणले आहे आणि ही सर्वसाधारण योजना नाही याकडे केंद्रीय मंत्र्यांनी निर्देश केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि भारतातील जनतेसाठी पायाभूत सुविधांचे अधिक चांगले नियोजन तसेच अंमलबजावणी कशी करता येईल यावर सुमारे दोन दशके गांभीर्याने केलेल्या विचारमंथनातून उदयाला आलेल्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेला अत्यंत सखोल अर्थ लाभला आहे असे ते म्हणाले. सरकारचे प्रमुख या भूमिकेतून गेली अनेक वर्षे काम केलेले पंतप्रधान मोदी प्रशासनात अभिनव विचार पद्धती आणण्यासाठी ओळखले जातात आणि भारताला समृध्द तसेच विकसित देश बनवण्यासाठीची त्यांची कल्पना सुस्पष्ट आहे असे मंत्र्यांनी पुढे सांगितले. सर्व हितसंबंधी भारताची 2047 पर्यंत विकसित देश म्हणून घडण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि या वाटचालीत पंतप्रधान गतिशक्ती योजनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे यावर गोयल यांनी अधिक भर दिला.
या कार्यक्रमादरम्यान, भारताचे पायाभूत सुविधाविषयक नियोजन आणि विकासात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महत्त्वाच्या विविध उपक्रमांची सुरुवात तसेच अनावरण करण्यात आले.केंद्रीय मंत्र्यांनी भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश साधने आणि भू-माहितीशास्त्र संस्थेतर्फे (बीआयएसएजी-एन) विकसित करण्यात आलेल्या विचारणा -आधारित अॅनॅलिटिक्स यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महा योजना (एनएमपी) मंच खासगी क्षेत्रासाठी खुला केला. यामुळे भू-अवकाशीय डाटा आणि अत्याधुनिक अॅनॅलिटिक्स उपलब्ध होण्यासाठी अधिक विस्तृत पोहोच निर्माण झाली. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान गतिशक्ती सारांश खंड-3 चे अनावरण केले. या खंडात यशस्वी उदाहरणे आणि सर्वोत्तम पद्धती यांची माहिती दिली आहे. याबरोबरच त्यांनी पीएमजीएस एनएमपी डॅशबोर्ड या प्रगतीचे अवलोकन करणाऱ्या आणि कृतीयोग्य विचार मिळवून देणाऱ्या व्यापक बहुक्षेत्रीय अहवाल प्रणालीची सुरुवात केली. सरकारची विविध मंत्रालये,विभाग तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रशासने यांच्या दरम्यान परस्पर-अध्ययन आणि ज्ञानाचे सामायीकीकरण शक्य करणाऱ्या ज्ञान व्यवस्थापन प्रणाली (केएमएस)ची देखील सुरुवात गोयल यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच विविध क्षेत्रांमध्ये ऑफशोअर विकासाचे एकात्मिक नियोजन आणि व्यवस्थापनासाठी पंतप्रधान गतिशक्ती-ऑफशोअर या समर्पित डिजिटल मंचाचे अनावरण देखील केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याव्यतिरिक्त, त्यांनी विकेंद्रीकृत, वास्तव वेळी उपलब्ध डाटाची मालकी तसेच जबाबदारी वाढवण्यासाठी डाटा अपलोडिंग आणि व्यवस्थापन प्रणालीची (डीयुएमएस)सुरुवात केली. त्याबरोबरच डाटाद्वारे चलित स्थानिक पायाभूत सुविधा विकास आणि समग्र प्रादेशिक विकास आणखी बळकट करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आकांक्षित जिल्ह्यांसाठी पीएमजीएस जिल्हा महायोजनेची (डीएमपी) सुरुवात करण्यात आली तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रांतील असामान्य नेतृत्व आणि नवोन्मेष याचं सन्मान करण्यासाठी लॉजिस्टिक्स विषयक उत्कृष्टता, प्रगती आणि कामगिरी ढाल (लीप्स) 2025 प्रदान करण्याची सुरुवात करण्यात आली.
जेव्हा पीएम गतिशक्ती योजनेचा शुभारंभ झाला तेव्हा पंतप्रधानांनी,आत्मनिर्भर भारताचा संकल्प करतच ,पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला जात आहे,यावर भर दिला होता,असे पियुष गोयल यांनी अधोरेखित केले.विविध क्षेत्रे आणि संस्थांच्या पलीकडे जात, एक प्रभावी साधन म्हणून, व्यापक पातळीवरील (मॅक्रो-लेव्हल प्लॅनिंग) आणि सूक्ष्म पातळीवरील (मायक्रो-लेव्हल) अंमलबजावणीच्या दरम्यान एक महत्त्वाचा पूल म्हणून पीएम गतिशक्ती योजना उदयास आली आहे,असे गोयल यांनी सांगितले. या उपक्रमामुळे राष्ट्रीय विकासावर अभूतपूर्व परिणाम होणार असून ते आता रस्ते संरेखन किंवा रेल्वे मार्गांचे नियोजन करण्यापुरते मर्यादित नाही, तर आता राष्ट्रीय नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सखोल एकात्मता सुलभ करत आहे असे त्यांनी पुढे सांगितले,
112 आकांक्षी जिल्ह्यांसाठी पंतप्रधान गतीशक्ती जिल्हा प्रमुख आराखडा (मास्टर प्लॅन) सुरू केल्याने, आता एकाच एकात्मिक डेटाबेसमध्ये ते अंतर्भूत (मॅप) केले गेले आहे, यामुळे या प्रदेशांच्या समग्र विकासात्मक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल,असे त्यांनी पुढे सांगितले.
वाहतूक खर्चात लक्षणीय घट झाली आहे, विशेषतः शेवटच्या टोकापर्यंतच्या दळणवळणात सुधारणा झाल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान गतीशक्ती आता क्षेत्र-आधारित नियोजन दृष्टिकोनाद्वारे विविध प्रदेशांच्या विकासावर सकारात्मक परिणाम करत आहे आणि याचा मागोवा घेण्यासाठी एक व्यापक बहु-क्षेत्रीय अहवाल प्रणाली सुरू करण्यात आली आहे,असे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, या उपक्रमाचे प्रमुख लक्ष्य आकांक्षी जिल्ह्यांपर्यंत पोहोचणे आहे, जेणेकरून क्षेत्र-विशिष्ट नियोजन स्थानिक गरजा पूर्ण करेल आणि या प्रदेशांची पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढेल.
पीएम गतीशक्ती उपक्रम आता भौतिक पायाभूत सुविधांपेक्षा सामाजिक पायाभूत सुविधा, मानवी विकास, उद्योग सहभाग आणि डिजिटल एकात्मतेकडे विकसित होत आहे,यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.हा उपक्रम राष्ट्रीय विकासाचा केंद्रबिंदू बनला आहे, जो एकात्मिक, समावेशक आणि डेटा-चालित वाढीला प्रोत्साहन देतो.
पियुष गोयल यांनी असेही भर दिला की या उपक्रमामुळे भारताच्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजना आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत एक आमुलाग्र बदल झाला आहे.
गेल्या चार वर्षांत केलेली प्रमुख कामगिरी:
- नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (एनपीजी) ने पीएम गतीशक्ती तत्त्वांचा वापर करून 300 हून अधिक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन केले आहे, ज्यामध्ये एकात्मिक नियोजन, शेवटच्या टोकापर्यंत वाहतूक सुविधा, इंटरमॉडल लिंकेज, वाढीव वाहतूक कार्यक्षमता आणि समक्रमित प्रकल्प अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
- सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्रमुख राष्ट्रीय आराखड्याशी (मास्टर प्लॅन) सुसंगत प्रमुख राज्य आराखडा (SMP) पोर्टल विकसित केले आहेत, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक सुलभ होऊन प्रकल्प अंमलबजावणीला गती मिळेल.पीएम गतिशक्ती पोर्टलवर 600 हून अधिक प्रकल्पांचे नियोजन आणि मॅपिंग करण्यात आले आहे.
- सामाजिक-आर्थिक विकासासाठी पीएम गतिशक्तीचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करून, हा उपक्रम आता सामाजिक आणि आर्थिक मंत्रालयांपर्यंत विस्तारला आहे.
- एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनात पीएम गतिशक्ती आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान यांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मादागास्कर, सेनेगल आणि गांबिया या देशांसोबतही आंतरराष्ट्रीय सहकार्य सुरू[v1] [v2] आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178646)
Visitor Counter : 6