सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
नव्या स्वरूपातील ‘सुगम्य भारत अॅप’चे गोव्यातील पर्पल फेस्टमध्ये अनावरण
Posted On:
11 OCT 2025 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने (डीईपीडब्ल्यूडी) गोव्यातील पर्पल फेस्ट दरम्यान नव्या स्वरूपातील ‘सुगम्य भारत अॅप’चे अनावरण केले. या विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्यक्रम झाला.
वापरकर्ता आणि सहजप्राप्त यांना प्राधान्य देत नव्याने केलेले हे अॅप भारताचे डिजिटल सुलभता म्हणून परिकल्पित केले असून ते दिव्यांग व्यक्तींना माहिती, योजना आणि सेवा थेट त्यांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देईल. हे अॅप एसबीआय फाउंडेशनच्या सहाय्याने आणि एनएबी दिल्ली, आयएसटीईएम आणि मिशन अॅक्सेसिबिलिटी यांच्या तांत्रिक भागीदारीत विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये स्क्रीन रीडर सुसंगता, व्हॉईस नेव्हिगेशन आणि बहुभाषिक समर्थन असून कोणीही वापरकर्ता मागे राहणार नाही याची सुनिश्चिती करण्यात आली आहे.

अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले अद्वितीय डिजिटल प्लॅटफॉर्म असून त्यात अनेक सशक्त वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या सुलभ मॅपिंग फंक्शनद्वारे वापरकर्ते सार्वजनिक ठिकाणे शोधू शकतात आणि गुणांकन करू शकतात, ज्यामुळे समुदाय-आधारित डेटा संकलनाला चालना मिळते.
या अॅपमध्ये शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती, लाभ, आणि रोजगाराच्या संधींची एकत्रित माहिती एका क्लिकवर मिळते, ज्यामुळे अनेक पोर्टल्सवर फिरण्याची गरज संपते. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त नोकरी आणि शिक्षणाच्या संधींची यादी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातून उपलब्ध आहे.
या अॅपच्या तक्रार निवारण विभागाद्वारे वापरकर्ते सुलभ नसलेल्या पायाभूत सुविधा आणि सेवांविषयी थेट तक्रार नोंदवू शकतात, ज्यामुळे सार्वजनिक सेवांची जबाबदारी सुनिश्चित होते. हे अॅप सहाय्यक तंत्रज्ञानाशी सुसंगत, अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, आणि अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही व्यासपीठासाठी अनुकूलित आहे.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान राजेश अग्रवाल म्हणाले की, “सुगम्य भारत अॅप हे केवळ तांत्रिक सुधारणेचे उदाहरण नाही, तर सक्षमीकरणाचे प्रवेशद्वार आहे. हे दिव्यांग व्यक्तींना संधी, माहिती आणि प्रवेशयोग्यतेचा अधिकार त्यांच्या स्मार्टफोनद्वारे जोडते.”
एसबीआय फाउंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ साहू यांनी सांगितले की, “समावेशक तंत्रज्ञान समाजातील दरी कमी करू शकते आणि लाखो लोकांची क्षमता पुढे आणू शकते,” असे सांगत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177939)
Visitor Counter : 6