दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारत-यूके कनेक्टिव्हिटी आणि इनोव्हेशन सेंटरच्या शुभारंभासह भारत आणि यूके दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ
Posted On:
10 OCT 2025 6:50PM by PIB Mumbai
भारत आणि युकेने डिजिटल समावेशनाला चालना देण्यासाठी आणि सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण संप्रेषणाचे भविष्य घडवण्यासाठी आज एका ऐतिहासिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. भारत-युके कनेक्टिव्हिटी अँड इनोव्हेशन सेंटर प्रगत कनेक्टिव्हिटीमध्ये यूके आणि भारतीय नवोपक्रमातील पूरक ताकद एकत्र आणेल - विद्यापीठांमध्ये अत्याधुनिक संशोधन, प्रयोगशाळा चाचणी आणि फील्ड चाचण्यांसह, बाजारपेठेतील तैनातीपर्यंत जोडेल. हा उपक्रम उद्योग भागीदारांना बाजारपेठ उपलब्धतेसह नवोन्मेष, चाचणी आणि उत्पादनाचा विस्तार करण्यास सक्षम करून नवीन व्यावसायिक संधी निर्माण करेल.

पुढील चार वर्षांमध्ये , 6G साठी तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मापदंड आकार घेतील अशा एका महत्त्वाच्या काळात, केंद्र तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रगती करेल:
• कृत्रिम बुद्धिमत्तेसह दूरसंचार क्षेत्राचे परिवर्तन - नेटवर्कचे इष्टतमीकरण करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नवीन सेवांचा धांडोळा घेण्यासाठी प्रगत एआय साधनांचा वापर करणे.
नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क्स (एनटीएनएस) - ग्रामीण आणि दुर्गम भागात विश्वासार्ह, हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी उपग्रह आणि हवाई प्रणाली विकसित करणे.
• टेलिकॉम सायबरसुरक्षा - व्यवसाय आणि ग्राहकांसाठी संप्रेषण प्रणाली अधिक लवचिक आणि अधिक विश्वासार्ह बनविण्यासाठी नेटवर्क सुरक्षा मजबूत करणे आणि खुले आणि परस्परसंवादी उपाय विकसित करणे.
कनेक्टिव्हिटी आणि टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान हे आपल्या अर्थव्यवस्था आणि समाजांना अत्यंत महत्त्वाचा आधार देतात. एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे त्यांचा विकास केल्याने दोन्ही देशांना आर्थिक आणि सुरक्षा फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे.

भारत आणि युकेने या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी चार वर्षांत एकत्रितपणे प्रारंभिक £24 दशलक्ष देण्यास सहमती दर्शवली आहे. हा निधी प्रस्थापित युके आणि भारतीय संशोधन केंद्रांमधील उपयोजित संशोधन, उद्योग-शैक्षणिक भागीदारी, संयुक्त चाचणी केंद्रे आणि जागतिक तांत्रिक मानकांच्या विकासात लक्ष्यित सहकार्याला पाठबळ देईल.
युकेआरआय आणि दूरसंचार विभागाने संयुक्तपणे युके-भारत तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून सादर केलेला हा उपक्रम, युके-भारत संशोधन आणि नवोन्मेष कॉरिडॉरचे एक पथदर्शी उदाहरण आहे आणि उभय पंतप्रधानांच्या 2035 दृष्टिकोनात मांडलेली सामायिक महत्त्वाकांक्षा यातून प्रतीत होते.
***
सुषमा काणे / वासंती जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177597)
Visitor Counter : 8