राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान गुजरात दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2025 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 9 ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीत गुजरात दौऱ्यावर राहतील.
राष्ट्रपती 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी राजकोट येथे पोहोचतील.
10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती सोमनाथ मंदिरात दर्शन घेतील आणि आरती करतील.त्याच दिवशी त्या गीर राष्ट्रीय उद्यानालाही भेट देतील आणि सासनगीर येथील स्थानिक आदिवासी समुदायाशी संवाद साधतील.
11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतील आणि आरती करतील.त्याच दिवशी त्या अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या 71 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176575)
आगंतुक पटल : 40