उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

93 व्या हवाईदल दिनाच्या उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी भारतीय हवाई दलाला दिल्या शुभेच्छा


अन्य अनेक मोहिमांबरोबरच ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय सशस्त्र दलांच्या, विशेषतः भारतीय हवाई दलाच्या अमूल्य योगदानाचे द्योतक होय : उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2025 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज 93 व्या हवाई दल दिनानिमित्त भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या.

समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, आपल्या आसमंताचे रक्षण करण्यापासून ते नैसर्गिक आपत्तींमध्ये सहाय्य आणि गरजेच्या वेळी मदत पुरवणारे भारतीय हवाई दल हे समर्पण, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे.

अन्य अनेक मोहिमांबरोबरच ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सशस्त्र दलांच्या, विशेषतः भारतीय हवाई दलाच्या अमूल्य योगदानाचे प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला.

सी. पी. राधाकृष्णन यांनी शूर हवाई योद्ध्यांचे निपुणता, धैर्य आणि अढळ बांधिलकीसाठी मनापासून आभार मानले.

निलीमा चितळे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2176386) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Tamil , English , Urdu , हिन्दी , Gujarati