कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय कौशल्य अर्हता समिती (NSQC) ची 44 वी बैठक नवी दिल्लीत पार पडली

Posted On: 08 OCT 2025 1:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेली राष्ट्रीय कौशल्य अर्हता समिती (NSQC) ची 44 वी बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव व राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेच्या (NCVET) अध्यक्ष देबश्री मुखर्जी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

या सत्राला पुरस्कर्त्या संस्था , केंद्र व राज्य सरकारचे विभाग व इतर भागधारक संस्थांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय कौशल्य अर्हता आराखड्याशी (NSQF) कौशल्य अर्हतांचे समायोजन करण्याशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. आरोग्यसेवा, कृषी, वाहन उद्योग, दूरसंचार, IT-ITeS, किरकोळ विक्री, दळणवळण, पर्यावरण, हॉटेल उद्योग, इत्यादी अनेकविध क्षेत्रांमधील एकूण 210 कौशल्य अर्हतासंबंधित माहिती मूल्यमापन आणि मंजुरीसाठी सादर केली गेली. भारतातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाची गुणवत्ता, अद्ययावतता व उपलब्धता सुधारण्यासाठी या अर्हता आवश्यक असतात.

या समितीत केंद्रीय मंत्रालयाचे प्रतिनिधी, राज्य कौशल्य विकास मिशन, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), AICTE, NSDC, DGT, व उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी होते. NSQCच्या या 44 व्या बैठकीची फलनिष्पत्ती, विशेषतः 210 कौशल्य अर्हतांचे मूल्यमापन झाल्याने भारताची कौशल्य विकास परिसंस्था अधिक बळकट होईल. त्यातून राष्ट्रीय व जागतिक उद्योगजगताची मागणी पूर्ण करून भावी आव्हानांना समर्थपणे पेलू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची फळी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2176193) Visitor Counter : 13
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil