पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पीएमएनआरएफमधून आर्थिक मदत केली जाहीर

प्रविष्टि तिथि: 07 OCT 2025 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेत जखमी झालेले लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना रुपये 2 लाख आणि जखमींना रुपये 50 हजार इतकी आर्थिक मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले : 

“हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल मला अतिशय दुःख झाले आहे. या कठीण काळात प्रभावित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो यासाठी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ मधून रुपये 2 लाख, तर जखमींना रुपये 50 हजार देण्यात येतील.

— पंतप्रधान @narendramodi”

 

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2176058) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam