इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया-एआय इंपॅक्ट शिखर परिषद 2026 साठीच्या बोधचिन्हामध्ये नीतिमत्ता, वारसा आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पनेचा मिलाफ
Posted On:
07 OCT 2025 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025
नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या इंडिया-एआय इंपॅक्ट शिखर परिषद 2026 या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे नुकतेच केंद्र सरकारतर्फे अनावरण करण्यात आले.
मायगव्ह मंचातर्फे दिनांक 28 मे ते 12 जून 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या बोधचिन्ह रचना स्पर्धेतील प्रवेशिकांमधून सदर परिषदेचे बोधचिन्ह निवडण्यात आले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील इमर्जिंग टेक्नॉलॉजिसच्या पथकाने या स्पर्धेसाठी सादर झालेल्या अंतिम प्रवेशिकांचा आढावा घेतला. याच पथकाने विजेता निवडीची प्रक्रिया हाती घेतली होती. मायगव्ह मंचावर एकूण 599 प्रवेशिका सादर झाल्या त्यापैकी अजित पी.सुरेश यांची रचना विजेती ठरली.

विजेत्या रचनेतून मानवतेच्या कल्याणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाच्या जागतिक चळवळीचे नेतृत्व करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा दिसून येते. नीतिमत्तापूर्ण राज्यकारभार, न्याय आणि भारताच्या डिजिटल वाटचालीला आधार देणारी संवैधानिक मूल्ये यांचे प्रतीक असलेले अशोक चक्र या चिन्हाच्या केंद्रस्थानी आहे.
विजेते अजित पी.सुरेश म्हणाले, “या बोधचिन्हाची पहिली आवृत्ती मी केवळ 23 तासांमध्ये तयार केली आणि मग भारताची संकल्पना जगापर्यंत पोहोचवण्याचे प्रतीक ठरणाऱ्या एआयच्या नीतीमूल्यांचे मूर्त रूप दिसण्यासाठी त्यात बदल करत गेलो.”
बाहेरच्या बाजूला पसरत जाणारे न्यूरल नेटवर्क फ्लेअर्स समावेशक प्रगतीला चालना देण्यासाठी , भाषा, क्षेत्रे, उद्योग आणि भौगोलिक स्थितींमध्ये असलेली दरी सांधून घेणाऱ्या भारतातील एआयच्या परिवर्तनकारी ताकदीचे प्रतिनिधित्व करते.
बोधचिन्हात सर्वत्र दिसणारे रंगीबेरंगी ग्रॅडीयंट नवोन्मेष आणि समावेशकतेचे प्रतीक आहेत आणि त्यातून एआय क्रांतीचा भाग असलेले विविध उद्योग, संस्कृती आणि समुदायांचे प्रतिबिंब दिसते. रंगांचा हा वर्णपट अशोक चक्राद्वारे सूचित मूल्यांमध्ये रुजलेला आहे.
या प्रतिकात्मकतेला पूरक ठरणारी सुस्पष्ट आणि आधुनिक शब्दरचना स्पष्टता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून डिजिटल आणि प्रिंट मंचांच्या दरम्यान एक मजबूत स्मरण क्षमता तसेच प्रासंगिकता सुनिश्चित करते.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176013)
Visitor Counter : 8