संरक्षण मंत्रालय
18 व्या संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेक्षण मोहिमेसाठी आयएनएस सतलजचे मॉरिशसमध्ये पोर्ट लुईस येथे आगमन
Posted On:
02 OCT 2025 3:16PM by PIB Mumbai
18 व्या संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेक्षण मोहिमेसाठी भारतीय नौदलाचे विशेष हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज आयएनएस सतलजचे 29 सप्टेंबर 2025 रोजी मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे आगमन झाले.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या 14 व्या संयुक्त समितीच्या बैठकीत हायड्रोग्राफीसंदर्भातील दीर्घकालीन द्विपक्षीय सामंजस्य करारांतर्गत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात सुमारे 35,000 चौ. नॉटिकल मैल क्षेत्राचा समावेश केला जाणार आहे. क्षमताबांधणीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मॉरिशसमधील विविध मंत्रालयांतील अधिकारी जहाजावर उपस्थित राहून हायड्रोग्राफिक डेटा संकलन व प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणार आहेत.
आयएनएस सतलजचे मॉरिशसमध्ये सर्वेक्षणासाठी जाणे ही द्विपक्षीय वैज्ञानिक सहकार्य व रणनीतिक सागरी संबंधांप्रति वचनबद्धतेची ग्वाही आहे. ही भागीदारी दिशादर्शनातील सुरक्षितता वाढविणे, सागरी साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणे आणि हिंद महासागर प्रदेशातील प्रादेशिक सहकार्य बळकट करणे यासाठी महत्त्वाची आहे.
(4)IISZ.jpeg)
(4)FSQU.jpeg)
(4)3BOD.jpeg)
***
शैलेश पाटील / रेश्मा बेडेकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174204)
Visitor Counter : 7