संरक्षण मंत्रालय
एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाने साजरा केला आपला 25 वा स्थापना दिवस
Posted On:
01 OCT 2025 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2025
एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाने (एचक्यू, आयडीएस) आज आपला स्थापना दिवस साजरा केला. 01 ऑक्टोबर 2001 रोजी मुख्यालयाची स्थापना झाली होती. यंदा ते आपल्या सेवेच्या पंचविसाव्या वर्षात प्रवेश करत आहे. सशस्त्र दलांमध्ये संयुक्तपणा आणि एकात्मतेला चालना देण्यासाठी एक कायमस्वरूपी संस्था म्हणून संकल्पित, एचक्यू आयडीएस, हे सायबर आणि अंतराळ यासारख्या नवीन क्षेत्रांसाठी तिन्ही सेवा दलांमधील समन्वयाचा आधार म्हणून उदयाला आले आहे, जे भारताच्या एकात्मिक लष्करी सज्जतेला आकार देणारा एक प्रमुख घटक आहे.
गेल्या काही वर्षांत, एचक्यू आयडीएसने हा मार्ग सुरू ठेवला असून, नवीन संयुक्त लष्करी संरचना तयार करायला पाठिंबा दर्शवला आहे, आणि एकात्मिक थिएटर-स्तरीय यंत्रणा स्थापित करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेण्यात योगदान दिले आहे. क्षमता विकासामध्ये, एचक्यू आयडीएसने त्री-सेवा पथदर्शक आराखडे लागू करायला सहाय्य केले आहे, आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाला अनुसरून, स्वदेशी उपायांना गती देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांबरोबर ते सक्रियपणे कार्यरत आहे.
एचक्यू आयडीएसने सर्वोच्च लष्करी आणि नागरी नेतृत्वासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, आणि सर्वोच्च स्तरावर संयुक्त कमांडर्स परिषद (सीसीसी) आयोजित करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेने मित्र राष्ट्रांबरोबरच्या संयुक्त कर्मचारी चर्चेसाठी समन्वय साधला, तसेच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पातळीवर बहुराष्ट्रीय संरक्षण सहकार्य चौकटी अंतर्गत योगदान दिले, आणि बहुराष्ट्रीय संरक्षण सहकार्य चौकटीसाठी योगदान दिले.
मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (एचएडीआर), याला प्राधान्य देऊन, एचक्यू आयडीएसने समन्वित सराव आणि तैनातीद्वारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादाला पाठींबा दिला. कम्बाईन्ड ऑपरेशनल रिव्ह्यू अँड इव्हॅल्युएशन (CORE) कार्यक्रमामुळे 2025 मध्ये प्रशिक्षण आणि शिक्षणात सुधारणा झाली. त्याच बरोबर एचक्यू आयडीएसने सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अंतराळ, यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये, क्रॉस-सर्व्हिस इंटिग्रेशनला प्रोत्साहन देऊन, वैज्ञानिक संस्थांबरोबर संवाद वाढवून आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारताची सज्जता वाढवली.
ही एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी एका पथदर्शक आराखड्याची रूपरेषा आखण्यात आली, ज्यामध्ये संयुक्त ऑपरेशनल सिद्धांतालाप्रोत्साहन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला धोरणात्मक दृष्टीकोनाशी जोडणाऱ्या प्रशिक्षण चौकटीला संस्थात्मक करणे आणि बहुपक्षीय सुरक्षा सहकार्यात भारताची भूमिका वाढवणे, यावर भर देण्यात आला.
एचक्यू आयडीएसने आपल्या भूतकाळातील आणि वर्तमान कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला सलाम केला. नियोजन, सुरक्षा दलाची रचना, क्षमता विकास आणि सैद्धांतिक उत्क्रांतीमध्ये एकात्म दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. भारतीय सैन्याची परिचालन परिणामकारकता वाढवण्यात याचे मोठे योगदान आहे.
* * *
सोनल तुपे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173969)
Visitor Counter : 11