आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
“स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाविषयी ताजी माहिती
Posted On:
30 SEP 2025 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानात देशभरातून अभूतपूर्व सहभाग दिसून येत असून लाखो महिला, मुले आणि कुटुंबे व्यापक आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत.
29 सप्टेंबर 2025 पर्यंत, अभियानांतर्गत 11.31 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे (तपासणी आणि विशेष शिबिरे) आयोजित करण्यात आली आहेत, ज्यात देशभरातील 6.51 कोटींहून अधिक नागरिकांच्या सहभागाची नोंद झाली आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:
- उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी: 1.44 कोटींहून अधिक नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी आणि 1.41 कोटींहून अधिक नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात आली.
- कर्करोग तपासणी: 31 लाखांहून अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी आणि 16 लाखांहून अधिक महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. सुमारे 58 लाख लोकांची तोंडाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली.
- माता आणि बाल आरोग्य: 54.43 लाखांहून अधिक प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात आल्या , तर जवळपास 1.28 कोटी मुलांना जीवनरक्षक लस देण्यात आली.
- रक्ताल्पता आणि पोषण: 93 लाखांहून अधिक लोकांची रक्ताल्पता तपासणी करण्यात आली. लाखो कुटुंबांपर्यंत पोषण सल्लाविषयक सत्र पोहोचले.
- क्षयरोग आणि सिकलसेल तपासणी: 71 लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोग आणि 7.9 लाखांची सिकलसेल आजारासाठी तपासणी करण्यात आली.
- रक्तदान आणि पीएम-जेएवाय: 3.44 लाखांहून अधिक रक्तदात्यांनी नोंदणी केली, तसेच 13 लाखांहून अधिक नवीन आयुष्मान/पीएम-जेएवाय कार्ड जारी करण्यात आले.

एनएचएम आरोग्य शिबिरांच्या विस्तृत जाळ्याव्यतिरिक्त, एम्स, राष्ट्रीय महत्त्वाच्या इतर संस्था (आयएनआय), तृतीयक आरोग्य सेवा रुग्णालये, आयुष्मान आरोग्य मंदिरे, वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी संस्था देखील या राष्ट्रीय मोहिमेत आघाडीची भूमिका बजावत आहेत. या संस्थांनी हजारो विशेष शिबिरे आयोजित केली आहेत, जिथे लाभार्थ्यांना प्रगत तपासणी, निदान, समुपदेशन आणि उपचार सेवा प्रदान केल्या आहेत, ज्यामुळे राज्य सरकारे आणि समुदाय-स्तरीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
केंद्र सरकारी संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी संस्थांनी एकत्रितपणे 20,269 तपासण्या आणि विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत ज्यांचा 29 लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे भारतातील महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य अभियान आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील या उपक्रमात 17सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे , जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये 10 लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील जेणेकरून समुदाय स्तरावर महिला-केंद्रित प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करता येतील.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173415)
Visitor Counter : 3