अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
'वर्ल्ड फूड इंडिया 2025' च्या तिसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण तांत्रिक सत्रे, तंत्रज्ञान हस्तांतरण, सामंजस्य करार आणि विविध सहकार्यांचे आयोजन करण्यात आले
न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि युगांडा येथील प्रतिनिधीसोबत महत्त्वपूर्ण बैठकाही घेण्यात आल्या
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2025 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2025
'वर्ल्ड फूड इंडिया 2025' च्या तिसऱ्या दिवशी प्रभावी तांत्रिक सत्रे, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ज्ञानविनिमय या अनुषंगाने व्यापक कार्यक्रम घेण्यात आले. यामुळे अन्नप्रक्रिया व नवोन्मेषाचे जागतिक केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक दृढ झाली. पहिल्या दोन दिवसांत 4,657 'बी2बी' बैठक, 154 'जी2जी' बैठक आणि 9,564 'आरबीएसएम' बैठक झाल्या, तर यातील एकूण उपस्थिती 35,784 इतकी होती.
भागीदार व केंद्रबिंदू राज्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिशा यांनी आपली बलस्थाने दर्शविणारी विशेष सत्रे घेतली. मत्स्यव्यवसाय विभागाने 'मच्छीमारांच्या प्रगतीसाठी मत्स्य तंत्रज्ञान : प्रक्रिया व मूल्यवर्धनातील नवकल्पना' या विषयावर सत्र घेतले. यात मत्स्य व्यवसायातील प्रगती व मूल्यसाखळी विकासावर भर देण्यात आला. प्रायोजित सत्रांमध्ये जबाबदार व्यवसाय केंद्राने पुनरुत्पादक वनस्पती तेल क्षेत्रासाठी राष्ट्रीय आघाडीवर चर्चा केली, तर बीएल अॅग्रोने 'राष्ट्र 2025 : कृषी परिवर्तनासाठी जोखीम विश्लेषण परिसंवाद' आयोजित केला.
निफ्टेम-के (एनआयएफटीइएम-के) ने दोन महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांचे हस्तांतरण केले, 'सक्षम अंगणवाडी व अभियान पोषण 2.0 उपक्रम' इंटरलिंक फूड्स प्रा. लि. यांना, तसेच 'अनफर्मेंटेड मेयो' जीवनमित्र न्यूट्रास्युटिकल्स प्रा. लि. यांना हस्तांतरित करण्यात आले. त्याच दिवशी निफ्टेम-केने वैद्यकीय विज्ञान सरकारी संस्था (ग्रेटर नोएडा), ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायो रिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (इम्फाळ), ‘रेजुवोमी थेरप्यूटिक्स’ (बंगळूरू) आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलिअरी सायन्सेस’ (नवी दिल्ली) यांच्यासोबत सामंजस्य करार केले.
निफ्टेम-टी (एनआयएफटीइएम-के) ने रोजगार व संशोधनासाठी महाराष्ट्रातील ‘एन्व्हायरोकेअर लॅब्स प्रा. लि.’ सोबत आणि अन्न सक्षमीकरणाकरिता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी नवी दिल्लीतील ‘ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रुव्हड न्यूट्रिशन (जीएआयएन)’ सोबत सामंजस्य करार केले. तसेच, स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज 3.0 मध्ये विजेते ठरलेल्या नवी दिल्लीतील ‘फ्रुवेटेक प्रा. लि.’ सोबत सामंजस्य करारनामा केला.
शिखर परिषदेच्या जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि युगांडा या देशांसोबत सरकारांदरम्यान बैठकांचे आयोजन करण्यात आले. यामुळे कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्यास अधिक चालना मिळाली.
'वर्ल्ड फूड इंडिया 2025' हे सहकार्य, नवोन्मेष व गुंतवणूक यांचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असून, भारताच्या अन्न अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनास गती देत जागतिक भागीदारी अधिक मजबूत करत आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172431)
आगंतुक पटल : 25