दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाने आंतरदेशीय स्पीड पोस्टच्या (कागदपत्र) दरात बदल करून सादर केली  नवीन वैशिष्ट्ये

Posted On: 26 SEP 2025 8:35PM by PIB Mumbai

 

टपाल विभागाने देशभरात पत्रे आणि पार्सल जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्यासाठी 1 ऑगस्ट 1986 रोजी स्पीड पोस्ट ही सुविधा सुरु केली. भारतीय टपाल विभागाच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या सेवेची रचना कालबद्ध, कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने टपाल वितरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत, स्पीड पोस्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह टपाल सेवा म्हणून उदयाला आली असून, ती खासगी कुरिअर कंपन्यांच्या स्पर्धेत खंबीरपणे स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे.

स्पीड पोस्टने आपल्या सुरुवातीपासूनच, ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेता, सतत बदल स्वीकारले आहेत. देशातील पसंतीची डिलिव्हरी सेवा म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि ग्राहकांची सोय वाढवण्याच्या उद्देशाने पुढील नवीन वैशिष्ट्यांसह ती अद्ययावत करण्यात आली आहे:

· ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण

· ऑनलाइन पेमेंट सुविधा

· एसएमएस-आधारित डिलिव्हरीची सूचना

· सोयीस्कर ऑनलाइन बुकिंग सेवा

· ताजे डिलिव्हरी अपडेट्स

· वापरकर्त्यांसाठी नोंदणी सुविधा

आंतरदेशीय स्पीड पोस्टच्या दरात ऑक्टोबर 2012 मध्ये शेवटची सुधारणा करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या सुधारणा टिकवून ठेवण्यासाठी, वाढत्या परिचालन खर्चाची पूर्तता करण्यासाठी आणि नवोन्मेषामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, स्पीड पोस्टच्या (कागदपत्रे) दरांमध्ये आता तर्कसंगत बदल करण्यात आला आहे. दिनांक 25.09.2025 रोजी राजपत्र अधिसूचना क्रमांक 4256 द्वारे अधिसूचित केल्याप्रमाणे, सुधारित दर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होतील. सुधारित दर रचना पुढील प्रमाणे:

 

Weight/Distance

Local

 

upto 200 Kms.

201 to 500 Kms.

501 to 1000 Kms.

1001 to 2000 Kms.

Above 2000 Kms.

Up to 50 grams

 

19

47

47

47

47

47

51 grams to 250 grams

 

24

59

63

68

72

77

251 grams to 500 grams

 

28

70

75

82

86

93

* लागू असलेला अतिरिक्त जीएसटी

कागदपत्रे आणि पार्सल दोन्हीसाठी स्पीड पोस्ट अंतर्गत मूल्यवर्धित सेवा म्हणून नोंदणी देखील उपलब्ध असून, ग्राहक विश्वास आणि वेग एकत्र आणण्यासाठी विशिष्ट पत्त्यावर सुरक्षित वितरण करू शकतील. 'नोंदणी', या मूल्यवर्धित सेवेसाठी प्रति स्पीड पोस्ट आयटम (दस्तऐवज/पार्सल) रुपये 5/- नाममात्र शुल्क, तसेच लागू जीएसटी, आकारला जाईल, ज्यामध्ये ती वस्तू केवळ विशिष्ट पत्त्यावर अथवा संबंधित पत्त्यावरील अधिकृत व्यक्तीला वितरित केली जाईल.

त्याचप्रमाणे, 'वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) डिलिव्हरी', या मूल्यवर्धित सेवेसाठी प्रति स्पीड पोस्ट आयटम (कागदपत्र/पार्सल) 5 रुपये शुल्क आणि लागू असलेला जीएसटी आकारला जाईल. या वैशिष्ट्याअंतर्गत, डिलिव्हरी कर्मचाऱ्यांबरोबर शेअर केलेल्या ओटीपीची ची यशस्वीपणे खात्री  झाल्यानंतरच वस्तू संबंधित पत्त्यावर दिली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्ट सेवांची सुलभता वाढवण्यासाठी, स्पीड पोस्ट शुल्कावर 10% सूट लागू केली आहे. याशिवाय, नवीन मोठ्या प्रमाणातील ग्राहकांसाठी 5 टक्के विशेष सवलत सुरू करण्यात आली आहे.

हे उपक्रम भारतीय टपाल विभागाच्या अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवा प्रदाता, म्हणून विकसित होण्याच्या प्रवासाचा एक भाग आहेत. शाश्वत नवोन्मेष आणि विश्वास वाढवणारी वैशिष्ट्ये सादर करून, स्पीड पोस्ट, ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेतानादेशाचा सर्वात विश्वासार्ह आणि किफायतशीर डिलिव्हरी भागीदार म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.

***

शैलेश पाटील / राजश्री आगाशे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172020) Visitor Counter : 20
Read this release in: English , Hindi , Malayalam