संरक्षण मंत्रालय
डीजीआरच्या वतीने नवी दिल्लीत सैन्य दलातील अधिकाऱ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
Posted On:
23 SEP 2025 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या अंतर्गत पुनर्वसन महासंचालनालयाच्या (DGR) वतीने 22 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे नोकरीच्या संधींच्या शोधात असलेल्या सैन्य दलातील निवृत्त/ निवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांना एकत्र आणण्यासाठी रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळ्यात 100 हून अधिक रिक्त पदे देऊ करणाऱ्या 26 कंपन्या आणि नोकरीच्या शोधात असलेले 300 हून अधिक सैन्य दलातील अधिकारी सहभागी झाले होते.
या मेळाव्याद्वारे अधिकाऱ्यांना त्यांनी सैन्यातील सेवाकाळात आत्मसात केलेली तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्ये दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. यामध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कौशल्याची पडताळणी केली जाईल तसेच नंतर पर्यवेक्षण, तांत्रिक, व्यवस्थापन आणि प्रशासन आणि धोरणात्मक सल्लागार म्हणून विविध पदांवर नियुक्त केले जाईल.
या उपक्रमामुळे अनुभवी, शिस्तबद्ध आणि कुशल अधिकाऱ्यांची निवड करणे कंपन्यांना शक्य होत असल्याने त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरते. हा रोजगार मेळावा माजी सैनिकांना दुसऱ्यांदा करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डीजीआरद्वारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
शिल्पा पोफाळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170101)
Visitor Counter : 4