राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

ग्लोबल साऊथ  राष्ट्रांतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग संस्थामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या भागीदारीने मानवाधिकारांच्या आयटीइसी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 21 SEP 2025 3:30PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क  आयोगाने (NHRC) परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (MEA) सहकार्याने, नवी दिल्लीत 22 ते 27 सप्टेंबर 2025 ग्लोबल साऊथ (विकसनशील) राष्ट्रांतील राष्ट्रीय मानवी हक्क  संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, मानवी हक्कांविषयी सहा दिवसीय, भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यकारी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विकसनशील राष्ट्रांतील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांच्या क्षमता बळकट करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.  जागतिक मानवी  हक्क संवाद, दक्षिण- दक्षिण सहकार्य आणि हक्काधारित प्रशासनाच्या सामूहिक प्रगतीसाठी देशाच्या राष्ट्रीय मानवी हक्क  आयोगाने (NHRC) सातत्यपूर्ण वचनबद्धता दर्शवली आहे.

सहभागी देशांमधील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांच्या गरजा आणि आयोगाने पूर्वी आयोजित केलेल्या तीन आयटीईसी क्षमता बांधणी कार्यक्रमांमध्ये दिलेला अभिप्राय यांना अनुकूल हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. मॉरिशस, जॉर्डन, जॉर्जिया, फिलिपिन्स, कतार, फिजी, उझबेकिस्तान, बोलिविया, नायजेरिया, माली, मोरोक्को आणि पॅराग्वे या राष्ट्रांतील 12 राष्ट्रीय मानवी हक्क  संस्थांचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दशकांच्या राष्ट्रीय मानवी हक्क  आयोगाच्या अनुभवाच्या प्रेरणेतून, आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश ग्लोबल साऊथ  राष्ट्रांमध्ये समर्थन, अंमलबजावणी आणि संस्थांत्मक बळकटीकरणासाठी सखोल समज, परस्पर शिकवण आणि अर्थपूर्ण सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न हा असेल. क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण देणे यांचे ज्ञान आणि कौशल्य असलेल्या प्रमुख व्यक्ती या प्रशिक्षक असतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मानवी हक्क  आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमणियम यांच्या हस्ते होणार आहे.

मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीय आयामांची चांगली समज विकसित करणे, राष्ट्रीय मानवी हक्क  आयोग, मानवी हक्क  संरक्षण क्षेत्रामध्ये भारताचे काम आणि त्यातील इतर राष्ट्रीय मानवी हक्क संस्था स्वीकार करू शकतील अशा सर्वोत्तम पद्धती यांची सखोल समज, राष्ट्रीय मानवी हक्क  संस्थांमधील सुधारित संपर्क जाळे, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य आणि भागीदारी वृद्धिंगत करणे तसेच मानवाधिकारांच्या संरक्षण आणि संवर्धन यांच्यामध्ये योगदान देण्याची क्षमता वृद्धिंगत करणे, हे सर्वं यामध्ये अपेक्षित आहे.

सहभागी अधिकारी या क्षेत्रांतील जाणकार आणि कार्यकर्त्यांशी परस्पर संवाद सत्रांमध्ये सहभागी होतील, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्षेत्र भेटी या माध्यमातून सहभाग नोंदवतील. मानवी हक्कांचा सन्मान, संरक्षण राखला जाईल, ते साजरे केले जातील अशा जगाच्या निर्मितीसाठी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क  आयोग कायमस्वरूपी वचनबद्ध असल्याचे द्योतक म्हणजे हा कार्यक्रम आहे. ग्लोबल साऊथ राष्ट्रांतील मानवी हक्क  आयोग संस्थांमधील संवाद, शिकवण आणि सहकार्य यांच्यासाठी गतिमान व्यासपीठ म्हणून काम करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 

***

शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी - साने / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169294) Visitor Counter : 3
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil