वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय शिष्टमंडळाच्या अमेरिका भेटीबाबत प्रसिद्धीपत्रक
प्रविष्टि तिथि:
20 SEP 2025 8:29PM by PIB Mumbai
अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने 16 सप्टेंबर 2025 रोजी भारताला दिलेल्या भेटीदरम्यान, व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा झाली आणि या संदर्भात प्रयत्न तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चर्चांना पुढे नेण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ 22 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेला भेट देणार आहे. परस्पर फायदेशीर व्यापार करारावर लवकर निष्कर्ष काढण्याच्या उद्देशाने हे शिष्टमंडळ चर्चा पुढे नेण्याची योजना आखत आहे.
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2169099)
आगंतुक पटल : 18