सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
वेळ वापर सर्वेक्षण (TUS), 2024 विषयावर डेटा वापरकर्त्यांची परिषद
डिजिटल युगात वेळेचा वापर, काळजी घेण्याच्या पद्धती आणि लिंग-आधारित विविध भूमिका यांच्या बदलत्या स्वरूपाचा शोध
Posted On:
20 SEP 2025 12:06PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) तिरुवनंतपुरम येथील विकास अभ्यास केंद्र (CDS) च्या सहकार्याने, 22 सप्टेंबर 2025 रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे डेटा वापरकर्त्यांची, वेळ वापर सर्वेक्षण (TUS), 2024 वरील परिषद आयोजित करत आहे. या परिषदेत डेटा उत्पादक आणि वापरकर्ते यांच्यातील संवाद मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे जेणेकरून सामाजिक-आर्थिक धोरणनिर्मितीसाठी TUS डेटाचे महत्त्व आणि अनुप्रयोग याबद्दल सखोल अंतर्दृष्टी मिळू शकेल.
वेळेचा वापर सर्वेक्षणात (TUS), एक व्यक्ती सशुल्क किंवा निशुल्क सेवांसाठी / कामासाठी, शिक्षण आणि विश्रांतीसाठी त्यांचा वेळ कसा देतात याबद्दल मौल्यवान माहिती देऊ करण्यात आली आहे. टीयूएस 2024 हे 2019 च्या आधीच्या सर्वेक्षणावर आधारित आहे आणि भारतातील काम आणि जीवनशैलीतील बदलांचा मागोवा घेण्यासाठी तुलनात्मक पुरावे प्रदान करते, विशेषतः लिंग भूमिकांच्या संदर्भात आणि विकसित होत असलेल्या सामाजिक-आर्थिक गतिशीलतेचा यात अंतर्भाव आहे.
परिषदेच्या उद्घाटन सत्रात माजी कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग, सेंटर फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह्जच्या माजी संचालक इंदिरा हिरवे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज (सीडीएस)च्या संचालक वीरमणी आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस)च्या महासंचालक सुश्री गीता सिंग राठोड उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात सुमारे 175 सहभागी भाग घेतील, ज्यात संशोधक, अर्थशास्त्रज्ञ, धोरणकर्ते, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, नागरी समाजाचे प्रतिनिधी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था आणि माध्यमे यांचा समावेश असेल. डोमेन तज्ज्ञ आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे (NSC) सदस्य देखील उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर सर्वेक्षणाची रचना, प्रमुख निष्कर्ष आणि TUS डेटाची उपयुक्तता यावर तांत्रिक सत्रे, एक पॅनेल चर्चा आणि सहभागींशी खुला संवाद होईल. या कार्यक्रमात TUS डेटाची उपयुक्तता आणि लिंग आधारित भूमिका, रोजगार आणि काळजी विषयक सेवा, अर्थव्यवस्थेवरील समावेशक धोरणे तयार करण्यात त्याची भूमिका याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होईल.
तांत्रिक सत्रात ‘वेळेचा वापर सर्वेक्षण 2024’ च्या डिझाइन, कार्यपद्धती आणि प्रमुख निष्कर्षांवर लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच सर्वेक्षणाच्या मागील फेऱ्यांमधील तुलनात्मक माहिती देखील असेल. सादरीकरणे TUS डेटाचा धोरणात्मक अनुप्रयोग आणि धोरणात्मक प्रासंगिकतेवर प्रकाश टाकतील, ज्यामध्ये प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांचे योगदान असेल. "नवीन डिजिटल युगात वेळेचा वापर, काळजी घेण्याचे काम आणि लिंग भूमिका बदलाचे नमुने" या विषयावरील पॅनेल चर्चेत आघाडीच्या संस्थांमधील तज्ञ, डॉ. सनी जोस, डीन स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सायन्सेस, एसआरएम विद्यापीठ, प्रो. नीथा एन, सेंटर फॉर वुमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज (सीडब्ल्यूडीएस), दीप्ती शर्मा, व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर, आयआयएम अहमदाबाद, सेंटर फॉर वुमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज, एसआरएम विद्यापीठ, सीडब्ल्यूडीएस आणि आयआयएम अहमदाबाद आणि प्रा. थियागु रंगनाथन, सीडीएस यांना एकत्र येतील. काम, काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या आणि डिजिटलायझेशनच्या विकसित होत असलेल्या गतिशीलतेवर चर्चा करण्यासाठी इथे ऊहापोह होईल.
संपूर्ण परिषदेत झालेल्या चर्चेतून मिळालेल्या विचारांची आणि निष्कर्षांची थोडक्यात रूपरेषा देऊन या कार्यक्रमाचा समारोप होईल. देशाच्या सांख्यिकीय चौकटीत वाढ करण्यासाठी MoSPI च्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी ही परिषद होणार आहे. या चर्चासत्रांमुळे भारताच्या सांख्यिकीय प्रणालीमध्ये वेळ वापर सर्वेक्षणाची प्रासंगिकता बळकट होईल, ज्यामुळे धोरणकर्त्यांना मजबूत डेटा समर्थनासह गंभीर सामाजिक-आर्थिक प्रश्नांना तोंड देण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
***
शिल्पा पोफळे / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168884)