पंतप्रधान कार्यालय
लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांचे आकस्मिक निधन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. संगीत क्षेत्रामधील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील, असे मोदी म्हणाले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणालेः
"लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसला आहे. संगीत क्षेत्रामधील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील. त्यांची गीते सर्व स्तरांमधील लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होती. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168795)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam