दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दुबईतील 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल कॉंग्रेसमध्ये यूपीयू ची प्रशासन परिषद आणि टपाल परिचालन परिषदेमध्ये भारताची फेरनिवड
भारताची फेरनिवड टपाल सुधारणा, डिजिटल परिवर्तन आणि जागतिक सहकार्यामधील भारताचे नेतृत्व अधोरेखित करते
Posted On:
19 SEP 2025 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे झालेल्या 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन काँग्रेस दरम्यान भारताची युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू) ची प्रशासन परिषद (सीए) आणि पोस्टल ऑपरेशन्स कौन्सिल (पीओसी), अर्थात टपाल परिचालन परिषदे मध्ये पुन्हा निवड झाली आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था, टपाल क्षेत्रातील भागधारकांमधील सहकार्यासाठीचे प्राथमिक व्यासपीठ आहे. सीए ही धोरण, नियमन आणि प्रशासकीय बाबींसाठी जबाबदार आहे,तर पीओसी ही तांत्रिक आणि परिचालन संस्था असून, ती जगभरातील टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाला चालना देते.
भारताची फेरनिवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारतीय टपाल विभागाच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नवोन्मेशी डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास प्रतिबिंबित करते. भारत 1876 पासून युपीयूचा सदस्य आहे आणि जागतिक टपाल जाळे मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान देत आहे.
मागील काँग्रेसदरम्यान भारताने डिजीपिन (डिजिटल अॅड्रेसिंग), यूपीआय-सक्षम सीमापार रेमिटन्स, आणि डाक घर निर्यात केंद्रांद्वारे ई-कॉमर्स सुविधा, यासारख्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना चालना दिली, क्षमता वृद्धीला आणि आशिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशातील टपाल अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (आयटीईसी) कार्यक्रमांतर्गत दक्षिण-दक्षिण सहकार्याला भक्कम पाठिंबा दिला, आणि सदस्यत्व योगदान आणि ऐच्छिक निधीद्वारे संघाच्या आर्थिक शाश्वततेसाठी लक्षणीय योगदान दिले. मागील कार्यकाळात सुरू केलेल्या या उपक्रमांच्या आधारावर, भारत या कार्यकाळात नवोन्मेष, समावेशकता आणि जागतिक सहकार्याप्रति नव्या वचनबद्धतेसह हे प्रयत्न अधिक दृढ आणि व्यापक करेल.
या फेरनिवडणुकीसह, जागतिक टपाल क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यात, नवोन्मेष, सर्वसमावेशकता आणि विकासाला चालना देण्यात भारत सक्रिय भूमिका बजावेल. भारताने आगामी काळात प्रशासन परिषदेत नेतृत्वाची भूमिका घेण्याचा आपला हेतू देखील व्यक्त केला आहे.
केंद्रीय दूरसंवाद आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री, ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी X वर घोषित केले:
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168676)