अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएफआरडीए ने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (दिनांक 01.04.2025 ते 31.08.2025 या दरम्यान सेवेत रुजू झालेल्या) एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा (यूपीएस) पर्याय निवडण्यासंदर्भात एक वेळ पर्यायाची सुविधा उपलब्ध करून दिली

Posted On: 16 SEP 2025 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिनांक 24.01.2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या वैध अधिसूचना क्र. F. No. FX-1/3/2024-PR अन्वये पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तीवेतन योजना (यूपीएस) अधिसूचित केली.

या योजनेसंदर्भात अलीकडेच दिलेली स्पष्टीकरणे आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता दिनांक 01.04.2025 रोजी अथवा त्यानंतर आणि 31.08.2025 पर्यंत केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (एनपीएस) पर्याय स्वीकारलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देखील एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेमध्ये (युपीएस) स्थलांतरित होण्यासाठीच्या एक-वेळ पर्यायाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यूपीएस अंतर्गत इतर पात्र श्रेणींसाठी याआधीच निर्धारित केलेल्या अंतिम मुदतीला अनुसरून आता नव्याने पात्र कर्मचाऱ्यांना 30.09.2025 रोजी अथवा त्यापूर्वी सदर पर्याय निवडता येईल.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपश्चात आर्थिक सुरक्षिततेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने माहितीपूर्ण निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कर्मचारी आधी यूपीएसचा पर्याय स्वीकारून, नंतरच्या काळात एनपीएसमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय राखून ठेवू शकतात.

टीप: एनपीएसमध्ये समाविष्ट असलेले विद्यमान पात्र कर्मचारी तसेच आधी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना यूपीएसचा पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.


शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2167414) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu