निती आयोग
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनच्या,मेगा टिंकरिंग डे ने विक्रमी सहभागासह इतिहास रचला,इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली नोंद
Posted On:
15 SEP 2025 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025
संपूर्ण भारतात नवोन्मेष आणि उद्योजकतेची संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल इनोव्हेशन मिशन सुरू केले होते. आज, नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन हे जगातील सर्वात मोठ्या तळागाळातील नवोपक्रम चळवळींमध्ये गणले जाते आणि त्यांचा प्रमुख उपक्रम असलेल्या मेगा टिंकरिंग डे 2025, ची प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याने या उपक्रमाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
एकाच दिवसात टिंकरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने हा एक नवा विक्रम रचला आहे. 12 ऑगस्ट 2025,रोजी 9,467 अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) शाळांमधील 4,73,350 विद्यार्थी स्वच्छ भारत संकल्पाच्या पूर्ततेसाठी उपाययोजनांवर विचार करण्यासाठी एकत्र आले आणि ऑनलाइन पद्धतीने टप्प्या टप्प्याने झालेल्या सूचना सत्राद्वारे त्यांनी व्हॅक्यूम क्लीनर तयार केले.
15 सप्टेंबर 2025 रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या दोन्ही संस्थांनी या विक्रमाची अधिकृतपणे पुष्टी केली आणि त्याची औपचारिक घोषणा केली. ही मान्यता म्हणजे भारतातील तरुणांमध्ये अभूतपूर्व नवोन्मेषाला आणि वैज्ञानिक स्वभावाला चालना देण्याच्या अटल इनोव्हेशन मिशनच्या ध्येयाचे प्रतीक आहे.
मेगा टिंकरिंग डे 2025 भारताच्या कानाकोपऱ्यातील शाळांपर्यंत पोहोचला, ज्यामध्ये लेह, लडाख, कारगिल आणि काश्मीरचे सीमावर्ती प्रदेश, विरुधुनगरसारखे आकांक्षी जिल्हे, मणिपूर, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही ईशान्येकडील राज्ये आणि दक्षिणेकडील कन्याकुमारी आणि पश्चिमेकडील भूज सारख्या दूरच्या भौगोलिक क्षेत्रांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांनी ज्या प्रमाणात या उपक्रमात सहभाग घेतला त्यावरून अटल इनोव्हेशन मिशनची भौगोलिक आणि पायाभूत सुविधांच्या अडथळ्यांना पार करण्याची क्षमता अधोरेखित झाली, त्यामुळे शोध आणि नवोपक्रमाच्या सामायिक प्रवासात विद्यार्थी एकत्र आले.


सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166781)
Visitor Counter : 2