कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाला राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान
Posted On:
14 SEP 2025 5:39PM by PIB Mumbai
हिंदी दिवसानिमित्त 14 सप्टेंबर 2025 रोजी, गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित सोहळा आणि अखिल भारतीय राजभाषा परिषदेदरम्यान, प्रशासन सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांना केंद्रिय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते,राजभाषा कीर्ती पुरस्कार (प्रथम ) प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार 2024-25 या वर्षासाठी 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालये/विभाग यांच्या श्रेणीमध्ये, राजभाषा हिंदीमध्ये सर्वोत्तम कामगिरी दर्शवल्याबद्दल गृह मंत्रालयाद्वारे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाला प्रदान करण्यात आला. विभागाला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्राच्या राजभाषा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग वचनबद्ध असून या प्रयत्नांचा परिणाम म्हणून विभागात राजभाषेचा वापर सातत्याने वाढत आहे.विभाग आणि त्याची संलग्न कार्यालये, स्वायत्त संस्थांमध्ये केंद्राच्या राजभाषा धोरणाची अंमलबजावणीवर योग्य देखरेख ठेवतात.
***
सुषमा काणे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2166589)
Visitor Counter : 2