भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील माध्यम व संप्रेषण अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
तथ्य मांडणी व दिशाभूल करणारी माहिती खोडून काढण्यावर भर
Posted On:
12 SEP 2025 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
1. भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सर्व 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या माध्यम व संप्रेषण अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले.
2.या कार्यक्रमात 51 माध्यम नोडल अधिकारी (एमएनओज) व समाज माध्यम नोडल अधिकारी (एसएमएनओज) सहभागी झाले.
3. उद्घाटन सत्रात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार , निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंह संधू व डॉ. विवेक जोशी यांनी सहभागी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
4. दिशाभूल करणाऱ्या माहितीचा वाढता धोका लक्षात घेता, भारतात निवडणुका संविधानाच्या चौकटीत काटेकोरपणे पार पाडल्या जातात हे स्पष्टपणे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तसेच चुकीची माहिती सतत तथ्यांच्या आधारे खोडून काढण्याची गरज असल्यावर भर देण्यात आला.
5. सीईओ कार्यालयांच्या संप्रेषण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि माध्यमे व इतर संबंधित घटकांना वेळेवर व तथ्याधिष्ठित माहिती पुरविण्यासाठी विविध सत्रे घेण्यात आली.
6. या कार्यशाळेत माध्यम व सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) याविषयी समर्पित सत्रे आयोजित करण्यात आली.
7. याशिवाय, दिशाभूल करणाऱ्या माहितीला प्रत्युत्तर देण्यासाठी उपलब्ध साधने, तंत्रे व धोरणांवर तज्ज्ञांचे सत्रही झाले.
8. ही कार्यशाळा अशा प्रकारची तिसरी परस्परसंवादी बैठक ठरली. यापूर्वी 9 एप्रिल 2025 व 5 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील भारतीय निवडणूक व्यवस्थापन संस्थेत (आय आय आय डी ई एम) माध्यम व संप्रेषण अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सुषमा काणे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166104)
Visitor Counter : 2